दादासाहेब रावल हायस्कूल ते मोठा पुल पर्यंतच्या रस्त्याला आद्य कवी महर्षी वाल्मिक ऋषी नाव द्या- नगरसेवक हितेंद्र महाले यांची माजी मंत्री आ. जयकुमार रावल यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

21

✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)

दोंडाईचा(दि.29जुलै):-(श. प्र.) शहराच्या विकासात आणि सुशोभीकरणात अधिक भर टाकणारा दादासाहेब हायस्कूल ते मोठ्या पुला पर्यंतचा रस्ता माजी मंत्री आ. जयकुमार रावल, नगराध्यक्षा नयनकुवर रावल यांच्या प्रयत्नांने व मार्गदर्शनाने तयार करण्यात आला. तरी या रस्त्याला रामायण रचनाकार आद्य कवी महर्षी वाल्मिक ऋषी यांचे नाव देण्यात यावे.

अशा आशयाचे निवेदन नगरसेवक हितेंद्र महाले यांच्या संकल्पनेतून नगरसेवक नरेंद्र गिरासे, शिक्षण सभापती नरेंद्र कोळी, मनोज निकम यांनी व परिसरातील नागरिकांनी माजी मंत्री आ. जयकुमार रावल यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. आद्य कवी महर्षी वाल्मिक,ॠषी यांचे नाव देण्यात यावे ही विनंती.व नामकरण सोहळा घ्यावा.

यावेळी आ. रावल बोलतांना म्हणाले कि, लवकरात लवकर त्या रस्त्याला आद्य कवी महर्षी वाल्मिक ऋषी देण्यासाठी प्रयत्न केला असे विश्वास निवेदन देणाऱ्यांना देण्यात आला. याप्रसंगी तुंबा कोळी, महेंद्र माळी, राहुल कोळी, शांताराम कोळी, ज्ञानेश्वर महाजन, हिरालाल कोळी, अनिल कोळी, जितू कोळी, संतोष महाजन, भटू कोळी, भय्यू कोळी, गोपाल चौधरी, विशाल कोळी, जिभाऊ महाजन, रविंद्र महाजन, आदींच्या स्वाक्षऱ्या होत्या