जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परीसरात वृक्षारोपण

24

🔸बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांच्या हस्ते वृक्षारोपण

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.29जुलै):-चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ब्रम्हपुरी विभागीय कार्यालयाच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नागभीड येथील शाखेत आढावा सभा आयोजित करण्यात आली होती.सदर आढावा सभेचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांच्या हस्ते जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नागभीड शाखा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असून प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजे. व सोबतच त्याचे संवर्धन सुध्दा केले पाहिजे असे प्रतिपादन यावेळी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांनी केले.वृक्षारोपण प्रसंगी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा नागभीडचे व्यवस्थापक एम.व्ही.पोटे, बँकेचे विभागीय अधिकारी महेंद्र मातेरे व बँकेचे कर्मचारीवृंद यांची यावेळी उपस्थिती होती.