आईने पाठीवर हात फिरवल्याने कोणत्याही संकटाचा सामना करण्याची प्रेरणा मिळते – ह.भ.प.पुष्पाताई तावरे महाराज

21

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.30जुलै):-“आई ही आईच असते,नसते सांभाळणारी दाई.”आई असल्यावर कळते नसल्यावर समजते.आई व बाबा जाणे सोपी गोष्ट नाही.तुम्ही कितीही मोठे झालात ना तरी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा.आईने पाठीवर जरी हात फिरवला तरी कोणत्याही संकटाचा सामना करण्याचे बळ मिळते असे ह.भ.प.पुष्पाताई तावरे महाराज यांनी आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम यांच्या आई कै.सुमन भगवान कदम यांच्या प्रथम पुण्यस्मरण प्रवचन प्रसंगी सांगितले.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,धनसंपदा भगवंताच्या प्रालबद्धावर अवलंबून असते.

आई ४२ कुळाचा उद्धार तर बाबा २१ कुळाचा उद्धार करणारे असतात.नारी…. नारी मत कहो नारी है रत्न की खाण.मरावे पण किर्ती रुपी उरावे याप्रमाणे कै.सुमन भगवानराव कदम यांनी संस्काराने चांगले कुटुंब घडवले.खुप चांगले संस्कार दिले.माणुस धनाने कितीही मोठा झाला पण आई नसल्यास स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारीच असतो,आई बापाने केलेल्या उपकाराचे आपल्या कातड्याचे जोडे जरी शिवले तरी फिटणार नाहीत.जोपर्यंत आहेत तो पर्यंत आई वडीलांची सेवा करा.कर्मानुसार गती मिळत असते.आज आत्म मुक्तीचा दिवस आहे.

या दिवशी पुन्हा जन्माला यायला परवानगी मिळत असते.वस्त्रदान,अन्नदान,आत्म्याला गती देण्यासाठी महत्वाचे ज्ञान दान असते असेही सांगितले.तर यावेळी ह.भ.प.सविताताई खेडकर यांनी श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाल्या की,आईची सेवा महाराष्ट्रात कोणी अशी केली नसेल अशी सेवा अविनाश कदम यांनी केली आहे.ज्या आईने नऊ महिने पोटात वाढवले अशा आई वडिलांना वद्धाश्रमामध्ये काही लोक ठेवतात.कितीतरी मोठमोठ्या लोकांचे आई-वडील वृद्ध आश्रमात आहेत.किती ही मोठे दुःख आईच्या पदराखाली झाकले जाते.आई पवित्र असल्याने कुळी कन्यापुत्र जन्माला आले आहेत.यावेळी अविनाश कदम यांचे नातेवाईक,मित्र परिवार,पत्रकार मित्र तसेच लहान थोर मंडळी उपस्थित होती.