हणेगाव येथे गुणवंत विद्यार्थीनीचा सत्कार

    36

    ✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो.नं.९४०४६४२४१७

    हणेगाव(दि.३१जुलै):-हणेगाव येथील सावित्रीबाई फुले मुलींची शाळा येथे मार्च २०२१ मध्ये पास झालेल्या गुणवंत विद्यार्थीनींचा सत्कार यावेळी या शाळेत घेण्यात आला.
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सौ.सुरेखाताई राणे व तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रभुलिंग,मठपती सर, शशिकांत, रवींद्र वंटगिरे आदीजन उपस्थित होते. यावेळी माळगे सर यांनी विद्यार्थीनींना परीक्षेचे महत्त्व पटवून दिले तर विद्यार्थिनींना परीक्षा विषयी व अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळात अभ्यास करून गुणवंत होण्याचा सल्ला दिला तर या शाळेचे मुख्याध्यापक सुरेखाताई राणे यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात .

    यावेळी सर्व पालक व सर्व शिक्षक, विद्यार्थीनी उपस्थित होते यावेळी प्रशांत शेटकार, लक्ष्मण बडगे,सौं,अणीता मालशेटवार,सौं, सुनीता घोगडे, आर ,एस, येरनाळे,उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मठपती सर यांनी केले कार्यक्रमाची प्रस्तावना प्रशांत शेटकार सर यांनी केले .यावेळी सर्व कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रम घेण्यात आला सर्व विद्यार्थी‌नी गायत्री ज्यांते,आरती खानापुरे,आकांक्षा काडगे,श्रद्धा निलंगे,आकांक्षा पांचाळ, सेमी माध्यमाच्या विद्यार्थिनी तसेच मराठी माध्यमाच्या विद्यार्थीनी नंदनी कळशे, वैष्णवी संतपुरे, शालिनी मदने, स्नेहा पवार व पालक उपस्थित होते. यावेळी सर्व गुणवंतांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.