सरस्वती विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

52

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.1ऑगस्ट):-शहरातील सरस्वती विद्यालयात दिनांक 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी तर साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती याबद्दल या दोन्ही महापुरुषांना विद्यालयाच्या वतीने अभिवादन करण्यात आले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहेश्वरी सभेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ मंत्री,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरेखा महाजन व सांस्कृतिक विभाग प्रमुख अनंत काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरेखा महाजन यांनी लोकमान्य टिळक व शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छाया घोळवे , सारिका संगेवार, परमेश्वर कातकडे, भुवनेश्वरी निळकंठ, मधु खळीकर ,सचिन वाळके आदींनी प्रयत्न केले.