ब्रम्हपुरी येथिल धम्मभूमी परीसरात विविध प्रजातीच्या रोपट्यांची लागवड

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.1ऑगस्ट):- ब्रम्हपुरी येथिल धम्मभूमी परीसरात विविध प्रजातीच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली. लोकशाहीर, थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त स्मृतीशेष परमानंद नंदेश्वर संस्थापक अध्यक्ष दी बुध्दिस्ट एम्प्लॉईज अँड नान एम्प्लॉईज सोशल असोसिएशन व यशस्वी बुध्दिस्ट बचत गट ब्रम्हपुरी यांची आठवण सदोदित ताजी ठेवण्यासाठी दि. 1 आगस्ट 2021 ला धम्मभूमी खेड रोड ब्रम्हपुरी येथे विविध प्रकारच्या रोपट्यांचे वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी संघटनेचे व गटाचे पदाधिकारी खेमचंद नंदेश्वर, शांताराम भैसारे, देवानंद मेश्राम, डॉ. रविंद्र मेश्राम, सतीश डांगे, ईश्वर जनबंधू, मोहन नंदेश्वर, नरेश रामटेके, एकनाथ दोनाडकर, गिरीधर बारसागडे, रमेश रामटेके, मंगेश नंदेश्वर, धम्मबंधू मेश्राम, उपस्थित होते.

आजच्या काळात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा -हास होत आहे. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपण करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन उपस्थितांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव भिमराव ठवरे व कोषाध्यक्ष वैकुंठ टेंभुर्णे यांनी परिश्रम घेतले.