गंगाखेड लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा संपन्न

    33

    ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी )

    गंगाखेड(दि.2जुलै):- लायन्स क्लब या सेवाभावी संस्थेची संस्थेचा गंगाखेड शहराच्या नवीन कार्यकारणी चा पदग्रहण समारंभ येथील राजेश्वर फंक्शन हॉल येथे संपन्न झाला. अध्यक्षपदी अतुल गंजेवार,सचिवपदी गोविंदराज रोडे,कोषाध्यक्ष माधवजी गीते नवीन सर्व कार्यकरणी ला शपथ देण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री लॉ पुरुषोत्तमजी जयपुरिया उपप्रांतपाल हे शपथ विधी अधिकारी म्हणून होते. प्रमुख पाहुणे ला प्रवीण धाडवे रिजन चेअर पर्सन,संतोष नरवानीझोन चेअर पर्सन,लॉयन संतोष तापडिया झोन चेअरपर्सन,लॉयन केशव देशमुख कॅबिनेट ऑफिसर, दगडूशेठ सोमानी कॅबिनेट ऑफिसर,प्राध्यापक बालाजी ढाकणे कॅबिनेट ऑफिसर,रामेश्वर तापडिया कॅबिनेट ऑफिसर हे होते.

    या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते श्री अभिमान मुंडे व्याख्याते व समाजप्रबोधक यांनी आनंदी जीवनाचा हरवत चाललेला चेहरा या विषयावर अतिशय सुंदर असे मार्गदर्शन केले.दीप प्रज्वलन व ध्वज वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी पुरुषोत्तम जयपुरिया यांनी सर्व नवीन कार्यकारणी ला येणाऱ्या काळात आपापल्या जबाबदारीचे योग्य मार्गदर्शन केले. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात नवीन अध्यक्ष अतुल गंजेवार यांना मावळते अध्यक्ष प्रा.विश्वनाथ सोन्नर यांनी नूतन अध्यक्ष व सचिव यांना खुर्चीवर बसवले.

    तसेच कोरोना काळात विशेष कामगिरी करणारे गंगाखेड चे उपविभागीय अधिकारी सुधीरजी पाटील,तहसीलदार स्वरूप कंकाळ,पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर,वैद्यकीय अधिकारी हेमंत मुंडे,सामाजिक कार्यकर्त्या मंजुषा ताई दर्डा,मनोज नावेकर उपजिल्हा रुग्णालय,प्रवीण जायभाये,राजकुमार फड,तसेच गोविंद शेंडगे आदींना गंगाखेड सेवा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नवीन कार्यकारणीत राजीव आहेरकर, संभाजी वाडेवाले,संजय सुपेकर,अरुण मुंडे, ज्ञानेश्वर कापसे,जगन्नाथ आंधळे,विजय बंग,अभिनय नलदकर, भगत सुरवसे,तुषार उपाध्याय,प्रभाकर देशमुख,प्रदीप गुंडाळे,ज्ञानेश्वर अनंतवार,यांचा समावेश आहे. बाबासाहेब जामगे बालाजी कांदे अशोक केंद्रे दीनानाथ वाडकर पुरुषोत्तम भंडारी जगदीश तोतला प्रदीप जैन बी आर चिनके नागनाथ आप्पा धुळे संजय बर्वे कुबेर खांडेकर,डॉ.हेमंत मुंडे,डॉ.अर्जुन सोनवणे, डॉ.रितेश वट्टमवार,प्रा,अंकुश वाघमारे, हरिभाऊ सानप,प्रकाश घन, मोहन गीते,प्रशांत फड सचिन महाजन,सचिन दहिवाळ, गजानन डहाळे,प्रकाश टाक, संतोष गुंडाळे,विकास गुंडाळे, ज्ञानेश्वर गुंडाळे,चंद्रकांत गादेवार,राजू लांडगे, सदानंद पेकम,शैलेश नावेकर, अंबादास राठोड,अंगद औटी, सतीश फड,सुधाकर मुरकुटे,प्रभाकर मुरकुटे,मनीष काकाणी,गोविंद आय्या,उमेश पापडूआदी सदस्य व शहरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक लॉयन केशव देशमुख यांनी तर सूत्रसंचालन विजय बंग तर आभार गोविंद रोडे यांनी मानले.