येरगी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

84

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

देगलूर(दि.1ऑगस्ट):- तालुक्यातील मौजे येरगी ग्रामपंचायत वतीने अण्णाभाऊ साठे १०१ वी जयंती साजरी करण्यात आली. अण्णाभाऊ साठे याच्या प्रतिमेला अभिवादन सरपंच प्र. संतोष पाटील यांनी सर्व लोकप्रतिनिधी व गावकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

समाजातील दुर्बल घटकांना माणूस म्हणून जगण्यासाठी त्यानी लोकनाट्य, नाटक, कादंबरी, कथासंग्रह, शाहिरी, पोवाडे व चित्रपटाच्या माध्यमातून जनजागृती केली. त्यांनी त्यावेळी केलेल्या कामाचे फळे आज आपणांस मिळतं आहेत. अशा थोर समाजसुधारकांचे विचार आचरणात आणणे गरजेचे आहे अशी भावना सरपंच प्र. संतोष पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी हणमंतराव सोमावार, वैजनाथ पाटील कालीगवार, विरभद्र मठवाले, तटा मुक्त अध्यक्ष मल्लिकार्जुन भोकसखेडे, ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ बागेवार, मारूती काळीगवार, विश्वनाथ काळीगवार, गजानन सूर्यवंशी, पाडुरग वाघमारे, अशोक वाघमारे, शिवसेना शाखाप्रमुख राजेश्वर कुंचगे, भुमन्न पिटलावार, प्रभाकर काळीगवार, विरभद्र पाटील, राचप्पा चैडके, रेवणअप्पा मठवाले, मा.उपसरपंच यादव बरसमवार, पंढरीनाथ कांबळे, गणपत बरसमवार, नागनाथ बागेवार, मारोती बागेवार, आतेश्वर बागेवार, गोविंद तलारवार, शिवा कांबळे, दत्ता बोडावार, सुभाष सुर्यवंशी, संजय वाघमारे, बळीराम सुर्यवंशी, गावातील प्रतिष्ठित नागरीक व गावकरी उपस्थितीत होते.*