प्रधानमंत्री आवास रमाई घरकुल योजनेतील घरकुल त्वरित मंजूर करा-रिपाई(आठवले)गटाची मागणी

25

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

खटाव(दि.2ऑगस्ट):- तालुक्यातील गोरगरीब समाजातील मराठा, रामोशी, माळी, धनगर, तेली, न्हावी, सुतार, वाणी, मुस्लिम, परीट, वडार, कैकाडी, गोसावी, सुतार, कुंभार, लोहार, बौद्ध, मातंग, चांभार, ढोर, होलार, समाजातील लोकांना शासनाच्या प्रधानमंत्री आवास व रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळेल. या आशेवर बसले आहेत याची दखल घेत दि. 11 जुलैला पत्रकारांनी देखील या लोकांना न्याय मिळण्यासाठी आपल्या दैनिकात बातमी केली होती परंतु त्यावेळीही याची दखल घेतली गेली नाही. तरी लवकरात लवकर घरकुलाची यादी मंजूर करावी व गरीब कुटूंबातील घरकुल लाभार्थी ला न्याय द्यावा.

तसेच महाराष्ट्र शासनाचा काही लाभार्थींना जागेअभावी घरकुल योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामध्ये शासनाने तुकडे बंदी असल्यामुळे घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही अशा लाभार्थ्याना शासनाने एक गुंठयाचा दस्त करून घरकुलाचा लाभ द्यावा. अथवा शंभर रुपये स्टॅम्प पेपर व नोटरी वर देखील गोरगरीब मागासवर्गीय लोकांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा. शेकडो लोक घरकुल अभावी वंचित आहेत. तरी शासन स्तरावर लवकरात लवकर निर्णय घेऊन गोरगरीब लोकांना न्याय द्यावा. अन्यथा रिपाई (आठवले) गटाचे वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. हे निवेदन देताना खटाव तालुक्यातील कार्याध्यक्ष मा. गणेश भोसले, दत्ता शिंदे, संदीप काळे, महेंद्र माने, शरद नलावडे, ग्रा.सदस्य सचिन उमापे, अरविंद इंजे,अजित भोसले होते.