माण बाजार समिती निवडणुकीसाठी ‘माण विकास आघाडी’चा म्हसवड येथून प्रचाराचा शुभारंभ

29

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

माण(दि.2ऑगस्ट):-तालुका कृषी उत्तपन्न बाजार समिती हि कर्जबाजारी तोट्यात असणारी कसलेही हि उत्तपन्न नसणारी संस्था राहिली असुन म्हसवड, दहिवडी मलवडी, कुकूडवाड,गोंदवले आदी ठिकाणचे बाजार बंद मुळे मार्केट कमेटीची आवक थांबली असताना काही स्वार्थी मंडळीनी हि निवडणुक लादली आहे शेतकरी यांच्या हिताचा व फायद्याचा एक हि चांगला निर्णय न घेता शेतकरी यांच्या मालाला हमीभाव मिळवून देण्यात अपयश आलेल्या सत्ताधारी गटाला जनताच या निवडणुकीत मतदान नाकारुन बाजूला करणार आहे यापुढील काळात म्हसवड दहिवडीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकिचे पेट्रोल पंप, तसेच डांळींब,कांदा, वटाणा, बटाटा, ग्वार,भेंडी, टोमैटो आदी पिकांचे तालुक्यातच लिलाव होऊन शेतकरी सदन करण्यासाठी माण विकास आघाडीच्या कपबशी या चिन्हावरती शिक्का मारुन माण विकास आघाडीच्या उमेदवारांना विजय करण्याचे आवाहान राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी म्हसवड येथे प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी केले

माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षीक निवडणुकीच्या प्रचाराचा श्री गणेशा म्हसवड येथून श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यांना मंदिरात श्रीफळ वाढवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, हरणाई समुहाचे चेअरमन रणजित देशमुख, माजी नगराध्यक्ष अजितराव राजेमाने मनोज पोळ, एम के भोसले, बाबासाहेब माने, बाळासाहेब सावंत, उपसभापती कट्टे, खटावचे महेश गुरव, श्रीराम पाटिल ,विष्णुपंत अवघडे, नकुसाताई जाधव, पं स सदस्य तानाजी काटकर, अमोल काटकर, हणमंत पाटिल, शहाजी बाबर, पृथ्वीराज राजेमाने, काका माने, आदी मान्यवर उपस्थित होते

माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निमीत्ताने म्हसवड येथील जेष्ठ नेते राजे श्रीमंत अजितराव राजेमाने यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी उमेदवार व मतदार यांची बैठक घेण्यात आली या बैठकीस राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, राष्ट्रीय कांग्रेस व अनिल देसाई यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते माण विकास आघाडीच्या माध्यमातुन निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडून उपस्थीतांना मार्गदर्शन करताना जिल्हा बॅकेचे संचालक अनिल देसाई म्हणाले माझ्या कुकूडवाड गटातुन या निवडणुकीत ७५% मतदान आपल्या माण विकास आघाडीला मिळवून देणारच असा शब्द देसाई यांनी देवून आपला कार्यकर्ता मोठा व्हावा हि प्रत्येक नेत्याची महत्वकांक्षा असते त्याप्रमाणे आम्ही या महत्वकांक्षा बाजूला ठेवून एकत्र आलो आहे ते शेतकरी हितासाठी आलो आहे बाजार समितीच्या माध्यमातुन आगामी काळात शेतकरी हिताचेच निर्णय घेतले जातील तसेच गेली पाच वर्षे तोट्यात आणुन बाजार समितीचा कारभार हा मनमानी पध्दतीने चालवलेल्या सत्ताधारी पक्षाला यावेळी मतदार बाजुला ठेवेल यावेळी रणजितसिंह देशमुख, एम के भोसले, महेश गुरव आदीची भाषणे झाली