माण तालुक्यात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

27

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

म्हसवड(दि.2ऑगस्ट):-लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती माण तालुक्यात विविध भागात मोठ्या उत्साहात साजरी करणेत आली यावेळी विविध राजकीय,सामाजिक संघटनांच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली वाहणेत आली.म्हसवड शहरात अण्णाभाऊ साठे नगर,मल्हार नगर येथे रिपब्लिकन संघटना सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी खाऊ वाटप करून जयंती साजरी केली.

यावेळी आरपीआय अध्यक्ष महेश लोखंडे,माण विकास सामाजिक संस्था अध्यक्ष धर्मराज लोखंडे,दलित पँथर तालुका अध्यक्ष प्रमोद लोखंडे,वंचित बहुजन आघाडी शहर अध्यक्ष शहाजी लोखंडे,संतोष लोखंडे,युवा सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ लोखंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

ग्रामपंचायत मोगराळे येथे लोकशाहीर साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांची १०१ वी जयंती संपन्न झाली. यावेळी प्रमुख उपस्थिती सरपंच रामचंद्र राऊत, उपसरपंच अमोल भोसले व इतर पदाधिकारी ग्रामस्थ मोगराळे तसेच बाबासाहेब भोसले सर, धीरज खरात सर याची उपस्थिती होती.त्याचबरोबर मान तालुक्यातील गोदवले, वरकुटे मलवडी,शिंगणापूर,दहिवडी,महिमानगड,बीजवडी,आदी गावांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली वाहणेत आली.