आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस स्टेशन कोरपना व ग्रामीण रुग्णालय येथे कोरोणा योद्धे यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार

55

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

कोरपना(दि.2ऑगस्ट):- आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस स्टेशन कोरपना व ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे कोरोणा योध्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष यांनी श्री ढाकणे साहेब ठाणेदार पोलीस्टेशन कोरपना यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच इतर पोलिस कर्मचाऱ्यांचा सुद्धा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला ग्रामीण रुग्णालय कोरपना येथील श्री डाॅ आकाश जिवणे साहेब ग्रामीण रुग्णालय कोरपना यांचा सुद्धा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन श्री नारायण हिवरकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

तसेच इतर डॉक्टर,नर्स व कर्मचारी यांना सुद्धा प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रचे अध्यक्ष श्री सदाशिवराव ढाकणे साहेब ठाणेदार पोलीस्टेशन कोरपना हे होते तर प्रमुख पाहुणे श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष, श्री डॉ आकाश जिवणे, श्री आशिष ताजने युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, श्री अमोल आसेकर नगरसेवक, श्री ओम पवार युवा मोर्चा जिल्हा सचिव, श्री सुनील देवकर,बालु पानघाटे,श्री श्री जयंत जेनेकर पत्रकार लोकमत प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते श्री नारायण हिवरकर भाजपा अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात माननीय आमदार श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या जीवनावर प्रकाश टाकला त्यांनी कोविळ काळात गोरगरिबांना अन्नधान्याच्या किट,काॅन्सनटेटर आक्सिजन मशीन अनेक दवाखान्यात उपलब्ध करून दिल्या.

व अनेक लोकांचे प्राण वाचविले व जन उपयोगी केलेल्या कार्याचे कौतुक केले तसेच श्री ढाकणे साहेब ठाणेदार साहेब कोरपना,पोलीस कर्मचारी डॉक्टर,नर्स व इतर कर्मचारी यांचे सुद्धा कोरोना काळात केलेल्या कार्याचे कौतुक केले इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आषीश ताजने यांनी केले व संचालन अमोल आसेकर यांनी केले तर आभार ओम पवार यांनी मानले