रिपाई कार्यकर्त्यांचा वंचित मध्ये जाहीर प्रवेश

30

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

खटाव(दि.2ऑगस्ट):- तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करणेत आली यावेळी वंचित बहुजन आघाडी खटाव तालुका यांचे वतीने जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला.

1 ऑगस्ट थोर साहीत्यीक , समाज सुधारक आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडीय ( A ) गटाचे जिल्हा उपाध्यक्ष आयु. नितीन भोसले यांच्यासह अर्जुन भालेराव यांनी ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्वावर विश्वास ठेऊन सातारा जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे आधारस्तंभ जेष्ठ नेते मार्गदर्शक आयू. चंद्रकांत खंडाईत आप्पा यांचे प्रमुख उपस्थीतीत सातारा जिल्हा वंचित बहुजन आघाडी जिल्हा सचिव सुनिल कदम यांचे मार्गदर्शनाखाली गणेश भोसले, आनंद अडकरी, रवि डावरे, शांताराम भालेराव, जगन्नाथ जगताप , निखील भालेराव , निखील सरतापे आदी असंख्य कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडी या पक्षामधे जाहीर प्रवेश केला.

या कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ नेते चंद्रकांत खंडाईत यांनी मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मा . गणेश कारंडे , जिल्हा सचिव मा.सुधाकर काकडे, सातारा तालुका अध्यक्ष श्रीरंग वाघमारे आणि माण तालुका युवा नेतृत्व रणजित भैया सरतापे ,सचिन जाधव यांचेसह सर्व खटाव तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्त मोठ्या संखेने उपस्थीत होते
सर्व पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे वंचित बहुजन आघाडी खटाव तालुका प्रमुख संघटक तुषार बैले यानी पुष्पहार देऊन पक्षात स्वागत केले.विश्वास जगताप यानी उपस्थितांचे आभार मानले