भिम टायगर सेनेच्या वतीने लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

22

🔹लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती भिम टायगर सेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.2ऑगस्ट):-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी 35 कादंबऱ्या, 13 लोकनाट्य, 15 पोवाडे, एक शायरी पुस्तक, सात चित्रपट, तसेच एक प्रकाश वर्णन पुस्तकातून केलेल्या समाज प्रबोधनामुळे साहित्यावर आपली छाप पाडली. आणि क्रांतिकारी माणसांना त्यांनी आपल्या साहित्यातून अजरामर केले. अशा या महान साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती भिम टायगर सेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात व जयघोषाने पुसद बस स्थानकावर साजरी करण्यात आली.

यावेळी भिम टायगर सेना यवतमाळ जिल्हा अध्यक्ष किशोरदादा कांबळे, सामाजिक कार्यकर्ते बाबाराव उबाळे, बिटीएसचे जिल्हा सचिव अण्णा दोडके, प्राध्यापक महेश हंबर्डे, प्राध्यापक जनार्दन गजभिये, प्राध्यापक छायाताई हंबर्डे, सामाजिक कार्यकर्ते विष्णू सरकटे, बिरसा मुंडा ब्रिगेडचे अध्यक्ष मारोती भस्मे, ग्रामपंचायत सदस्य रूपाली इंगोले, या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्राध्यापक जनार्दन गजभिये यांनी आपल्या गीतातून प्रकाश टाकला. यावेळी प्राध्यापक महेश हंबर्डे व सामाजिक कार्यकर्ते बाबाराव उबाळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आपले विचार मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राहुल झिंगारे, नारायण दोडके, संदीप नाटकर, गजानन कांबळे, गजानन गायकवाड, शुभम दोडके, गजानन बोकारे, मिलिंद लोंढे, दत्ता कांबळे, नरेंद्र नरवाडे, गोपाल जगताप, मधुकर राऊत, विलास मधुकर सोनवणे व सर्व भीम टायगर सेनेचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीम टायगर सेनेचे तालुका उपाध्यक्ष प्रभाकर खंदारे यांनी तर आभार जिल्हा सचिव अण्णा दोडके यांनी मानले.