महामानवांचेच विचार जगाला तारू शकतात-प्रा.वसंतराव यादव

29

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

म्हसवड(दि.3ऑगस्ट):-फुले, शाहू,आंबेडकर,शिवाजी महाराज,उमाजी नाईक,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांचेच विचार जगाला तारू शकता असे प्रतिपादन प्रा.वसंतराव यादव यांनी आण्णा भाऊ साठे यांच्या 101व्या जयंतीनिमित्त व माणदेश सामाजिक संस्थेच्या 17 व्या वर्धापन दिंनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय जीवन गौरव सोहळ्यावेळी व्यक्त केले.

साहित्यसम्राट डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त व माणदेश शिक्षण विकास संस्था म्हसवडच्या 17व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय माणदेश जीवन गौरव पुरस्कार सोहळा 2021 कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा वसंतराव यादव जेऊर, प्रमुख वक्तेअण्णाभाऊ साठेंचे गाढे विचारवंत पीएचडी तज्ञ प्रा डॉ शरद गायकवाड सर( कोल्हापूर), व सत्कारमूर्ती युक्रांदचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा राजकुमार डोंबे व म्हसवड नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी मा डॉ सचिन माने, राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती सेल सातारा जिल्हाध्यक्ष माण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मा कदम साहेब, वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये नोंद असलेले धावपटू मुसा भाई मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते महादेव सरतापे, महेश लोखंडे प्रमोद लोखंडे, पत्रकार शहाजी लोखंडे,पत्रकार सचिन सरतापे, पत्रकार महेश कांबळे, पत्रकार सचिन मंगरुळे, पत्रकार एलके सरतापे,पत्रकार नागेश डोबे या सर्व पत्रकार बांधवांना व सामाजिक कार्यकर्त्यांना कोरोना योद्धा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

त्याचबरोबर म्हसवड पोलीस स्टेशनचे साहायक पोलीस निरीक्षक मा बाजीराव ढेकळे यांनाही कोरोना योद्धा पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले म्हसवड नगरपरिषदेचे नगरसेविका शोभाताई लोखंडे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष मा महेश भाऊ लोखंडे, संतोष लोखंडे, गोपाळ कृष्ण लोखंडे, अनिल लोखंडे, भीमराव सरतापे, तसेच संस्थेची इतर पदाधिकारी व तरुण बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष प्रा राजेंद्र माने यांनी केले.

प्रस्ताविक माणदेश शिक्षण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धर्मराज लोखंडे यांनी केले.डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन म्हसवड मल्हार नगर येथे 101 रोपांची लागण करण्यात आली साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी प्रा शरद गायकवाड सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व धन्यवाद दिले.