आष्टी येथील ॲड.बी.डी.हंबर्डे साहित्य पुरस्कार डॉ.दासू वैद्य यांना जाहीर

28

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.4ऑगस्ट):-तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अॕड.बी.डी.हंबर्डे महाविद्यालय आणि भाऊ फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने संस्थापक अध्यक्ष कै.बन्सीधरराव धोंडीबापू हंबर्डे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी साहित्य पुरस्कार,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख,सुप्रसिद्ध कवी,प्रा.डॉ.दासू वैद्य यांना जाहीर झाला आहे.दि.१८ऑगस्ट रोजी भाऊंचा स्मृतिदिन आहे.रुपये १००१ रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

कोरोना स्थिती लक्षात घेऊन संस्थाध्यक्ष किशोर हंबर्डे,प्राचार्य डॉ.सोपान निंबोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे असे भाऊ फाऊंडेशनचे कवी प्रा.सय्यद अलाऊद्दीन यांनी सांगितले.डॉ.दासू वैद्य यांची तुर्तास,तत्पूर्वी कवितासंग्रह,कवितेचा,भुर बाल कविता संग्रह,शिवाय आजूबाजूला,मेळ इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत.

मराठीतले आघाडीचे कवी,साहित्यिक,नभोनाट्य,एकांकीका,चित्रपट गीत लेखक असे विपुल लेखन त्यांनी केले आहे.कवी दासू वैद्य यांची कविता आजूबाजूच्या जीवनात अधिक रमते.विसंगती आणि विरोध ही त्यांच्या कवितेची शक्तिस्थाने आहेत.या अगोदर कवी प्रभाकर साळेगावकर,सोपान हाळमकर,श्रीराम गिरी या साहित्यिक,कवींना साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.