कार अडवून पतीस मारहाण करीत पत्नीचे दागिने ओरबडणाऱ्या त्रिकूटआस पोलिसांनी केले जेरबंद

25

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.4ऑगस्ट):- कार अडवून पतीस मारहाण करीत पत्नीचे दागिने ओढणाऱ्या ती घास पोलिसांनी जेरबंद केले ही घटना पंचवटीतील गणेशवाडी भागात घडली होती संशयिता चे साथीदार अद्याप फरार असून या घटनेनंतर संशयिताच्या टोळक्याने याच भागात एकावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता विक्की किशोर बजाज 24 राहणार शेरे मळा सहजीवन नगर अजय चंदर कुंदे 19 व अजय अनिल भोईर 21 राहणार मुजोबा चौक गणेश वाडी अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत भद्रकाली तीन नदीम निसार खान 30 भोई गल्ली यांनी याप्रकरणी घोटी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती.

खान दांपत्य रविवारी दिनांक एक गणेशवाडीतील साईबाबा मंदिर परिसरातून फॉर्ड फिगो mh15 सिटी 90 91 या कारमधून प्रवास करीत असताना ही घटना घडली होती अचानक समोर दाम्पत्य त्यांची कार अडवून गाडीच्या काचेवर बुक्के मारून काची चे नुकसान केले यानंतर नदीम खान यांना मारहाण करीत त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची चेन तसेच त्यांच्या पत्नी च्या गळ्यातील सुमारे तीस हजार रुपयाची सोन्याची पोत ओरडून नेली होती र दुसर्‍या घटनेत संबंधितावर एकाने धारदार शस्त्राने हल्ला केला होता.

भरदिवसा घडलेल्या घटनेची पोलीस आयुक्तांनी दखल घेतल्याने पंचवटी पोलीस ठाण्याची पोलीस कामाला लागले होते पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली असून त्यांचे साथीदार अद्याप फरार आहे ही कारवाई पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत निरीक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार पोलीस नाईक सागर कुलकर्णी शिपाई विलास चारोस्कर कुणाल पोचलो रे नितीन जगताप राजेश राठोड कल्पेश जाधव अंबादास केदार घनश्याम महाले आधीच्या पथकाने केली