एक शांत,सयंमी व्यक्तीमत्व – मा.आ.श्री.भीमसेन धोंडे साहेब

32

आष्टी तालुक्यातील रूई नालकोल येथे जन्मलेले मा.आ.श्री.भीमसेन धोंडे यांनी नगरमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण केले.सवंगडी सोबत घेऊन त्यांनी आष्टी तालुक्याच्या सामाजिक व राजकारणात प्रवेश केला.तत्कालीन प्रस्थापित मंडळींना विरोध करणे ही अत्यंत अवघड गोष्ट,तरीही त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेऊन विविध आंदोलने केली.नगर येथे शिक्षण घेत असतांना १९७५ साली नगर जिल्हा विद्यार्थी कृति समिती संघटनेच्या अध्यक्षपदी अविरोध निवड होऊन त्यांचे नेतृत्व उदयास आले.आष्टी,पाटोदा,शिरुर भागात मित्र मंडळींना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन दौरा केला.शेतकऱ्यांची बैठक घेऊन शेतकरी संघटीत करून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम त्यांनी सुरू केले.त्यातून शेतकरी संघटना चळवळ उभी केली.या संघर्षशील नेतृत्वाची विधानसभेवर निवड झाली.तसेच तालुक्यातील प्रत्येक खेडेगावातील मुला-मुलींना शिक्षण मिळाले पाहिजे अशी तळमळ त्यांच्या मनात नेहमीच येत असल्याने त्यांनी १९८२ साली शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली आणि रूईनालकोल येथे पहिली शाळा सुरू केली.

आपल्या गावात शाळा सुरू झाली परंतु आष्टी,पाटोदा,शिरुर तालुक्यातील मुलांना शिक्षण घेणे त्यावेळी अतिशय अवघड होते.हा भाग नेहमीच दुष्काळी राहिला असल्याने शिक्षणासाठी लागणारा पैसा अपुरा असल्याने मुलांना शिक्षण घेता येत नाही.ही परिस्थिती शिक्षणमहर्षी माजी आ.श्री.भीमसेन धोंडे यांनी पाहिली आणि शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाखा गावागावांत सुरू केल्या.यामध्ये प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यामिक,पदवी तसेच बीपीएड कॉलेज,बी.एड.,पदवी महाविद्यालये, डी.एड कॉलेज,कृषि विद्यालय, बी.एस्सी अँग्री,एमबीबीएस असे सर्व प्रकारचे शिक्षण सुरू केले.शिक्षकांसाठी पतसंस्था सुरू केली.अनेक शिक्षण संस्था आष्टी,पाटोदा,शिरुर तालुक्यात सुरू केलेल्या आहेत.या संस्थामध्ये संपुर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आष्टीमध्ये येतात.आष्टी तालुका शिक्षण क्षेत्रात बीड जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असला पाहिजे याचे श्रेय फक्त माजी आ.भीमसेन धोंडे यांनाच आहे.

आष्टी विधानसभा मतदार संघाचे तालुक्याचे सलग पंधरा वर्ष आमदार राहीले व पुन्हा २०१४ मध्ये निवडून आले.त्यांनी १९८० ते १९९५ या कालावधीमध्ये मोठी विकासकामे केली.नंतरच्या निवडणुकीत त्यांना अपयश आले असले तरी त्यांनी सामाजिक कार्यामध्ये कसलाही बदल केला नाही.त्यांनी आमदार असतांना प्रत्येक गावाला जाण्यासाठी रस्ता,तलाव,नळ योजना,विजेची सोय, शाळा,मंदिरे आदी विकासाची कामे केलेली आहेत.आजही ते तितक्याच जिद्दीने व धाडसाने शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी उभे रहात आहेत.आष्टी तालुक्याला कुकडीचे पाणी मिळावे म्हणून आष्टी ते मुंबई पायी मोर्चा तसेच शेतकऱ्यांसाठी आष्टी ते दिल्ली पायी मोर्चा काढला.माजी आ.भीमसेन धोंडे यांना सलग तीन वेळा निवडणुकीमध्ये अपयश आले तरी,आजपर्यंतचा मागील इतिहास पाहिला तर राजकारणात धोंडे साहेब हे कायम चर्चेत राहून समाजसेवेचे व्रत त्यांनी सोडले नाही.त्याची पावती म्हणून मतदारांनी पुन्हा २०१४ साली विधानसभेवर पाठवले.पुन्हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघाच्या विकासाला चालना मिळालेली आहे.
आष्टी मतदार संघ हा सातत्याने दुष्काळाच्या सावटाखाली आहे.२००१ पासून या मतदारसंघातील पाऊस ६० टक्याच्या पुढे गेलेला नाही.त्यामुळे नुसत्याच शेतीवर भागत नाही म्हणून स्थलांतर होत आहे.शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात त्यालाही कारण सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा हेच आहे.

त्यामुळे मतदार संघाला खात्रीशीर हक्काचे आणि कायमस्वरूपी पाणी आणणे हेच आपले ध्येय आहे आणि पुढचे राजकारण त्यासाठीच असल्याचे माजी आ.भीमसेन धोंडे म्हणतात.पुर्वी सरकारचे बजेट कमी असायचे मात्र सरकारमध्ये आणि लोकप्रतिनिधींमध्ये संवेदनशिलता होती,एखादी घटना घडली किंवा एखादा प्रश्न उपस्थित केला गेला तर संपुर्ण सभागृह प्रतिसाद द्यायचे,त्यावर चर्चा व्हायच्या मात्र दुर्दैवाने आता तितकीशी संवेदनशिलता राजकारणामध्ये राहिलेली नाही.असे माजी आ.धोंडे सांगतात.शेती हा महाराष्ट्राचा कणा आहे,मात्र शेतीकडे पहिल्यापासूनच सरकारने फारसे लक्ष दिलेले नाही.आजही त्या भागात सिंचनाच्या सुविधा नाहीत.१९८० पासून सोयी आणि सुविधा अपुऱ्या आहेत.आजपर्यंत खरे तर कृष्णा खोऱ्याचे पाणी आष्टी भागात यायला हवे होते.मात्र ते आलेले नाही आणि सिंचनाशिवाय प्रगती होत नाही हे वास्तव आहे.एकदा शेतकऱ्यांना खात्रीशिर पाणी मिळाले की तो प्रगती करू शकतो म्हणूनच सरकारने सिंचनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.असे धोंडे साहेबांना नेहमीच वाटते.

शेतकरी उपाशी आहे,त्याच्या पोटाला अन्न आणि हाताला काम देणे हे महत्वाचे आहे.त्याला इतर गोष्टींचा काय उपयोग आणि यासाठी पाणी गरजेचे आहे.ज्या भागात पाणी आहे तेथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नाहीत.शेतकरी आत्महत्येकडे निव्वळ एक प्रकरण म्हणून पाहून चालणार नाही.एकेकाळी कधीतरी एखादी आत्महत्या झाली तर संपुर्ण सभागृह गंभीर व्हायचे आता राज्यात रोज चार आत्महत्या होत आहेत.शेतीसाठीची धोरणे बदलावी लागणार आहेत.असे धोंडे साहेबांचे मत आहे.जर आरनाल्डो नावाचा नट वयाच्या ७५ व्या वर्षी हॉलीवूडमध्ये नायक म्हणून काम करू शकतो तर धोंडे साहेबांना काय अडचण आहे.मुळात लहानपणापासूनच धोंडे साहेबांवर व्यायामाचे संस्कार आहेत.४थीला असतांना त्यांची आई त्यांना सोडून गेली,मात्र आजोबा,वडिल,काका पहाटेच व्यायामाला न्यायचे.त्यांची मुलंही व्यायाम करतात,खेळतात.

या व्यायामाचा आणि खेळाचा एकंदरच परिणाम धोंडे साहेबांच्या शरीरावर झाला.तसेच त्यांनी ते सातत्य आजपर्यंत टिकदून ठेवलेले आहे.खेळ हा तर त्यांच्या आवडीच विषय आहे,जर धोंडे साहेब आज पर्यंत खेळत राहिलो असते तर प्रो कबड्डीमध्ये त्यांची किंमत कोटयावधीमध्ये झाली असती.महाविद्यालयीन जीवनापासून ते सातत्याने खेळत आलेले आहेत.कुस्ती,कबडी,अँथलेट आदी प्रकारामध्ये ते पुणे विद्यापीठाच्या संघात कायम असायचे.त्यामुळे वर्षातले तीन चार महिने ते पुण्यातच असायचे.खेळत असतांनाच विद्यालयीन जीवनातच १० टक्के भारत देश त्यांनी पाहिला आणि यातूनच एक खिलाडू वृत्ती त्यांनी आयुष्यात जोपासली,ज्याचा त्यांना आजही उपयोग होतो.तसा राजकारण हा विषय त्यांचा नव्हता पण त्यांच्याबददल प्रत्येकाला आकर्षण असायचे.सत्तेत असतांना आणि नसतानांही ते जेथे कोठे जातात तेथे लोक जमतात.हे केवळ आजचे नाही तर महाविद्यालयीन जीवनातही तेच चित्र असायचे.ते कॉलेजला असतांना त्यांच्याभोवती विद्यार्थ्यांचा घोळका कायम असायचा.कबड्डी आणि कुस्तीमध्ये ते त्यावेळी सर्वपरिचीत होते.त्यानंतर कुस्ती आणि कबड्डीमुळे त्यांचा परिसरातील अनेक गावांमध्ये परिचय झाला.

त्याचवेळी ते आष्टीच्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष झाले.नेमकेच त्यावेळी मतदार यादीतही त्यांचे नाव समाविष्ट झाले होते.शेतकरी संघटनेकडून त्यांनी निवडणूक लढवावी असा विचार कार्यकर्त्यात झाला आणि घरच्यांशी बोलून त्यांनी ती निवडणूक लढविली अन् ते दोन हजार मतांनी पराभूत झाले.परंतु परिसरात आपल्या मागे उभे राहणारे लोक भरपूर आहेत.याचा अंदाज त्यांना आला.त्यानंतर दोनच वर्षांनी पुन्हा निवडणुका झाल्या आणि ते १५ ते २० हजार मतांनी निवडून आले आणि मग राजकारणात रूळत गेले.जलयुक्त शिवार ही अत्यंत चांगली योजना आहे.नदी-नाले सरळ करणे, रूंद करणे,खोलीकरण करणे यावर जास्त लक्ष दिले जावे असा धोंडे साहेबांचा नेहमीच आग्रह राहिलेला आहे.ज्या कामाला १५ लाख रूपये लागतात तो सिमेंट बंधारा धोंडे साहेबांनी त्यांच्या काळात केवळ सव्वालाखात बांधला होता.

जलयुक्तमध्येही अशाच प्रकारे कमी निधी गुंतवून जास्त प्रमाणात फायदा कसा होईल हे पाहिले जात आहे.
दुष्काळामुळे या मतदार संघाची परिस्थिती बिकट होत चालली आहे.मतदार संघातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे.आपल्या मतदार संघातील लोकांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा आणि त्यांनी घरदार सोडून जावू नये ही परिस्थिती निर्माण करण्याचे मोठे काम मला करायचे आहे.असे धोंडे साहेब सांगतात.सिना मेहकरीच्या मंजुरासाठी काढलेला पायी मोर्चा आणि त्यामुळे मिळालेली मंजुरी,संरक्षण खात्याने या मतदार संघातील जमीन संपादन करण्याची प्रकिया सुरू केल्यानंतर आष्टी ते दिल्ली हा पायी मोर्चा काढून त्या प्रक्रियेला मिळविलेली स्थगिती.

मतदार संघात ठिकठिकाणी बांधलेले पाझर तलाव आणि रस्ते आणि शिक्षणाच्या निर्माण केलेल्या सुविधा ही महत्वाची कामे माजी आ.भीमसेन धोंडे यांनी केलेली आहेत.या मतदार संघाचा सर्वात महत्वाचा प्रश्न पाण्याचा आहे म्हणूनच सिना मेहकरी योजना पुर्ण करणे महत्वाचे आहे.असे माजी आ.भीमसेन धोंडे सांगतात.अशा या अष्टपैलू व्यक्तीमत्वास वाढदिवसानिमित्त मनस्वी हार्दिक शुभेच्छा…!!!

✒️लेखक:-राजेंद्र लाड (आष्टी)मो.९४२३१७०८८५