कुंटुर पोलीस ठाण्याचे ए पी आय श्री निलपत्रेवार यांना निलंबित करण्यात यावे

31

🔹अ.भा.छावा संघटना नायगाव तर्फ तहसीलदार यांना निवेदन

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)

नांदेड(दि5ऑगस्ट):- दिनांक 29 जुलै 2021 रोजी,मोजे इकळीमाळ ता. नायगाव येथे पंचायत समिती नायगाव चे विस्तार अधिकारी शेख मोहम्मद लतीफ मोहम्मद नवाज गायरान जागेवरील अतिक्रमण या संदर्भात पंचनामा करत असताना त्या ठिकाणी बाचाबाची झाली व त्या ठिकाणी पंचनामा होऊ शकला नाही त्या कारणाने विस्तार अधिकारी शेख लतीफ यांनी संबंधित कुंटुर पोलीस ठाण्यात शासकीय कामांत अडथळा आणल्या संदर्भात353 तक्रार दाखल करा म्हणून विनंती केली पण सदरील कुंटुर पोलीस ठाण्याचे एपीआय यांनी दाब देऊन सदरील घटनेस जातीवाचक शिवीगाळ दाखवून खोटा अट्रासिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या विषयी खुद्द तक्रारदार विस्तार अधिकारी यांनी रीतसर अर्ज करून त्यांच्यावर दबाव आणून कशाप्रकारे अट्रासिटी चा गुन्हा दाखल केलाय याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक नांदेड यांच्याकडे तक्रार दिलेली आहे , महोदय वरील घटना गंभीर असुन संबंधित एपीआय निलपत्रेवार या अधिकाऱ्याची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. अन्यथा अ.भा छावा संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा ईशारा अ. भा छावाचे जिल्हाध्यक्ष माधवराव ताटे पाटील नितीन गिरडे पाटील तालुकाध्यक्ष वि आ. नायगाव बालाजी पाटील धनंजकर तालुकाध्यक्ष संपर्क प्रमुख साई पाटील मोरे व छावाचे पदाधिकारी व ईकळीमाळ येतील हजारो युवक आणी नायगाव तालुक्यात हजारो मावळे उपस्थित होते…