नाना अण्णा फाऊंडेशनच्या नांदेड जिल्हा अध्यक्षतेपदी रावसाहेब पा.कदम व दत्तात्रय संगेवार यांची निवड

40

✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896948

कुंटूर(दि.5ऑगस्ट):- नवीन संकल्पनांचा नवीन योजनेचा नवीन उमेदीचा नाना अण्णा फाउंडेशन महाराष्ट्र ओपन अध्यक्षपदी रावसाहेब पाटील कदम ओबीसी जिल्हाध्यक्षपदी दत्तात्रेय संगेवार यांची निवड नाना फाउंडेशन महाराष्ट्राचे नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख मारोती मोतीराम यन्नावार यांच्या शिफारशीनुसार दोघांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली नियुक्तीपत्र देण्यासाठी नाना फाउंडेशन महाराष्ट्राचे मुख्य सल्लागार विनोद अण्णा भोसले नाना फाउंडेशन महाराष्ट्र परभणी चे उपजिल्हा अध्यक्ष प्रल्हाद मोहिते.

मारोती मोतीराम यन्ना वार यांच्या उपस्थिती मध्ये नियुक्ती पत्र देण्यात आले आहे व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या नाना अण्णा फाउंडेशन महाराष्ट्र ही संघटना बेरोजगार मुलांसाठी रोजगार मिळवून देण्यासाठी समृद्धी ग्रामीण कुटुंब प्रक्रिया उद्योग बेरोजगार युवकांना रोजगार हमीचे निर्मिती साठी सहकार्य करून शेतीमध्ये गुंतवणूक सुधारणा पणन साखरी व विविध महामंडळाच्या योजनेचा लाभ आपण तळागळातील पोहोचण्यासाठी नाना फाउंडेशन चे सहकार्य राहणार आहे व त्यासाठी तुम्ही कार्य कराल अशी जिम्मेदारी देऊन ओपन साठी नांदेड जिल्हा अध्यक्षपदी रावसाहेब पाटील कदम ओबीसी अध्यक्षपदी दत्तात्रय संगेवार यांची निवड करून नानांना फाउंडेशन महाराष्ट्राच्या कार्यात सहकार्य करून युवकांना रोजगार मिळून देण्यासाठी कार्य करणार याप्रसंगी संगेवार व कदम यांनी मनोगत व्यक्त केले.