“धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघटनेच्या” तालुकाध्यक्षपदी ऍड.भोलाणे तर, शहराध्यक्षपदी माळी यांची निवड

22

✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धरणगाव(दि.5ऑगस्ट):- धरणगांव येथे दिनांक १ ऑगष्ट, २०२१ रोजी साहित्यरत्न – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शासकीय विश्रामगृह येथे तालुका “अधिकृत पत्रकार संघटनेचे ” जेष्ठ सदस्य सर्वश्री. विजयकुमार शुक्ल, भगीरथ माळी, पी.एम.पाटील सर यांच्या नेतृत्वाखाली सर्व जुने, नवे पत्रकारांची बैठक आयोजित करून सदरचे बैठकीत विविध विषयावर चर्चा करून सर्वानुमते तालुकाध्यक्ष पदी दै.साईमतचे जिल्हा प्रतिनिधी ऍड. वसंतराव भोलाणे तर, शहराध्यक्षपदी दै.लोकमतचे लक्ष्मण माळी यांची निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की,

“धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघटनेच्या” माध्यमातून पत्रकार बांधवांचे संघटन करून अन्याय – अत्याचार झाल्यास सदैव पत्रकारांचे पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम हे संघटना काळजीपूर्वक तालुक्यात करीत राहणार. बातमी संकलन करीत असताना येणारे वेगवेगळे अनुभव अधिकारी देत असलेली वागणूक पत्रकारांवर होणारे हल्ले असे एक ना अनेक विषयावरती चर्चा करून जेष्ठ सदस्यांनी संघटनेचे महत्त्व व ध्येयधोरण पटवून सांगितले.धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघटनेचे सर्व नवनिर्वाचित सदस्यांची विविध पदाकरिता निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले. व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, तालुक्याची व शहराची कार्यकारिणी देखील उपस्थित पत्रकार बांधव यांचेतुनच घोषित करण्यात आली.

तालुका कार्यकारिणी : तालुकाध्यक्ष – ऍड.वसंतराव भोलाणे, उपाध्यक्ष – सतीश शिंदे सर, ता.सचिव – आर.डी. महाजन सर, ता.सरचिटणीस – पी.डी.पाटील सर, ता.संघटक – ऍड.हर्षल चौहान, प्रसिद्धी प्रमुख धनराज पाटील

शहर कार्यकारिणी : अध्यक्ष – लक्ष्मण माळी, उपाध्यक्ष – प्रा.मंगेश पाटील, सचिव – निलेश पवार, सरचिटणीस – विनोद रोकडे, संघटक – योगेश पी. पाटील, प्रसिद्धी प्रमुख – योगेश नवनीत पाटील

जेष्ठ सल्लागार – सर्वश्री. विजयकुमार शुक्ल, पी.एम.पाटील सर, भगीरथ माळी सर तसेच, सदस्यपदी – हाजी इब्राहिम शेख, किरण चव्हाण सर, राजेंद्र बाविस्कर, दिनेश पाटील, कमलाकर पाटील, विनोद बीजबीरे, प्रभूदास (बाळू) जाधव जितेंद्र महाजन, आबासाहेब राजेंद्र वाघ.या सर्व पत्रकार बांधवांचे सदस्यपदी सर्वानुमते निवड करण्यात आली सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून अभिनंदन केले, व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सर्व नवनिर्वाचित कार्यकारणीच्या वतीने सर्वप्रथम कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला माल्यार्पण करण्यात आले व अधिकृत पत्रकार संघाचा जयघोष करण्यात आला. नवनियुक्त तालुका अध्यक्ष ऍड.वसंतराव भोलाणे यांनी मी सदैव पत्रकारांच्या पाठीशी उभा राहील माझ्यावर जो विश्वास पत्रकार बांधवांनी दाखवला तो विश्वास मी सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करेल व धरणगाव शहर व ग्रामीण भागातील समस्यांचे पत्रकारितेच्या माध्यमातून निवारण करण्याचा प्रयत्न करेल असे प्रतिपादन केले.

यानंतर भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. तसेच धरणी चौकात राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून महापुरुषांच्या घोषणा देत अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश बोरसे यांनी तर आभार किरण चव्हाण सर यांनी मानले. कार्यक्रमाचा शेवट जेष्ठ पत्रकार बाळकृष्ण पाटील यांची प्रातिनिधिक स्वरुपात सदिच्छा भेट घेवून करण्यात आला.