कुंडलवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पक्ष बांधणी बैठक संपन्न …

35

✒️अशोक हाके(बिलोली ता.प्र.)मो:-9970631332

बिलोली(दि.5ऑगस्ट):- तालुक्यातील
कुंडलवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी येथे नगरपालिका निवडणुकीच्या अनुषगाने शहरात राष्ट्रवादी पक्षाची पक्ष बांधणी व पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम दिनांक 5 रोजी संपन्न झाला आहे.यावेळी उपस्थित मान्यवरांनी पक्ष्याच्या ध्येयधोरणावर चर्चा करुन आगामी नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भाने मार्गदर्शन केले,यावेळी या कार्यक्रमात गंगाधर तुमीदवार,रामा घारके,शेख जाविद शेख बाबू,शेख बाबा,शेख जहिर इस्माईल,शेख इमाम अनवर मिया,शेख नवाब राज्जोद्दीन आदीसह अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे.

यावेळी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून तालुकाध्यक्ष नागनाथ पाटील सावळीकर,तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड,जिल्हा सरचिटणीस गोसोद्दीन खुरेशी,माजी सभापती व्यंकट पांडवे,तालुका कार्यध्यक्ष नागनाथ खेळगे,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष सादिक पटेल,युवक तालुका उपाध्यक्ष निळकंठ दूडले,विद्यार्थी तालुका अध्यक्ष विकास दगडापूरकर,पिराजी पाटील आरळीकर,शहराध्यक्ष नरसिंग जिठ्ठावार,उपाध्यक्ष शेख इस्माईल (ईशु )युवक शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे,अल्पसंख्याक शहराध्यक्ष महंमद मुनीर आदीसह मोठ्या कार्यकर्ते उपस्थित होते…..