कांग्रेस चे जेष्ठ नेते भीमरावजी ठावरी यांचा ७२ वा वाढदिवस उत्साहात साजरा

25

🔸रुग्णालयात रुग्णांना केले फळ वाटप

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.5ऑगस्ट):-अखिल भारतीय राष्ट्रीय कांग्रेस चे माजी चिमूर शहर अध्यक्ष तथा चिमूर तालुका जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भीमरावजी ठावरी यांचा ७२ वा वाढदिवस उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गोपाल भगत, परिचारिका व रुग्णालयातील कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

पालकमंत्री नामदार विजय वड्डेटीवार यांच्या चिमूर येथील जनसंपर्क कार्यालयात भीमरावजी ठावरी यांच्या वाढदिवसनिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर यांनी भीमरावजी ठावरी यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांना त्यांच्या वाढदिवस निमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी माजी जीप सदस्य विलास डांगे, नेहरू विद्यालय चिमूर येथील नुकतेच सेवानिवृत्त झालेले प्राचार्य सुधीर पोहनकर सर, युवा सामाजिक कार्यकर्ता तथा चिमूर विविध सह. सोसायटीचे सचिव प्रदीप बंडे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजु हिंगणकर, राजेंद्र लोणारे, पालकमंत्री कार्यालय प्रमुख कमलेश बांबोडे, रत्नाकर विठाळे, रमेश बैंलनवार आदी उपस्थित होते.