मा.आ.भीमसेनजी धोंडे साहेब यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी कार्यक्रमाने साजरा

32

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती रा. लाड)

आष्टी(दि.5ऑगस्ट):-शिक्षणमहर्षी तथा मा.आ.भीमसेनजी धोंडे साहेब यांचा वाढदिवस (दि.५) मोठ्या समाजोपयोगी कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.कसल्याही प्रकारचे हारतुरे,फेटा,शाल न स्विकारता वाढदिवस साजरा करण्यात आला.विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात येवून आष्टी,पाटोदा,शिरुर मतदार संघात मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा करण्यात आला.अहिल्याबाई होळकर प्रा.शा.कडा कारख़ाना ता.आष्टी जि.बीड वाढदिवसानिमित्त हस्ताक्षर,चित्रकला,निबंध,वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.प्रथम,द्वितीय येणाऱ्या स्पर्धकास सन्मानपत्र व विविध बक्षीसे देऊन गौरव करण्यात आला.तसेच शिक्षकांनी ही भीमसेनजी धोंडे साहेब यांचा जीवन प्रवास,”शिक्षणमहर्षी” भीमसेनजी धोंडे साहेब,भीमरावजी धोंडेसाहेब ते भीमसेनजी धोंडेसाहेब या विषयांवर निबंध लिहून साहेबाना शुभेच्छा दिल्या व स्पर्धेत भाग घेतला.

यावेळी ऑनलाइन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक वृंद सुरेखा शेळके,पांडुरंग जाधव,सारिका गव्हाणे, प्रमोद राउत,सुनीता गदादे,युवराज भुसारे,निलोफर सय्यद यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक दिपक गदादे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.तसेच पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक विद्यालय आष्टी येथे मा.आ.भीमसेन धोंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आँनलाईन विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा यांचा समावेश होता.याप्रसंगी शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

आनंद चॅरिटेबल संस्था संचलित गंगाई फार्मसी कॉलेज कडा येथे माननीय संस्थापक अध्यक्ष भीमसेनजी धोंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद चॅरिटेबल संस्था संचलित गंगाई फार्मसी कॉलेज कडा येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात येवून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वेबीनार चे आयोजन करण्यात आले होते.सकाळी कॉलेजच्या समोर वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी भाग घेऊन प्रत्येकाने तीन झाडे लावली.त्याचबरोबर दुपारी डी.फार्मसी पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील काळात काही अडचणी येऊ नयेत म्हणून वेबिनार घेण्यात आले.यामध्ये ग्लैक्सो स्मीथक्लाईन फार्मास्युटिकल्स कंपनीमधील गोवा विभागातील बाह्य पुरवठा नियोजन मँनेजर प्रमोद जगताप यांनी विद्यार्थ्यांना औषध कंपनी मध्ये काम करताना काय करायला हवे तसेच औषध कंपनीमध्ये डी.फार्मसी विद्यार्थ्यांना किती स्कोप आहे.

व विद्यार्थ्यांनी काय तयारी करायला हवी हे सांगीतले तसेच अरीस्टो फार्मा कंपनी चे संपूर्ण राजस्थान विभाग सांभाळत असलेले झोनल मँनेजर मुकेश गुप्ता यांनी मार्केटिंग कसे जॉईन करावे,काय तयारी करावी व काय स्कोप आहे व काय करावे या बद्दल अनमोल मार्गदर्शन केले.या दोन्ही वक्त्यांना २५ वर्षा पेक्षा जास्त अनुभव होता.यावेळी गुगल मिट अँप वर कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन मार्गदर्शनाचा लाभ घेतला.सदरील कार्यक्रम हा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भीमसेनजी धोंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आल्या.यासाठी संस्थेचे अजय दादा धोंडे व अभय राजे धोंडे तसेच संस्थेचे प्रशासन अधिकारी डॉ.डी.बी.राऊत ,शिवदास विधाते,दत्तात्रय गिलचे,माऊली बोडखे,शिवाजी वनवे,संजय शेंडे यांनी मार्गदर्शन केले व साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व कॉलेजचे प्राचार्य अशोक गदादे व सोळंके रागीणी,राहुल दानवे,मंगल लाटे,साईनाथ पांढरे,अनिकेत डाके,गायत्री गावडे,सौ.विधाते मनीषा,अनारसे विकास,कणसे भाऊसाहेब,गांजुंरे गणेश,सौ.राऊत संगीता,शिंदे किशोर यांनी वृक्षारोपण करुन ऑनलाइन वेबीनार मध्येही सहभाग नोंदवून संस्थापक अध्यक्ष भीमसेनजी धोंडे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.अशा विविध समाजोपयोगी कार्यक्रमाने शिक्षणमहर्षी मा.आ.भीमसेनजी धोंडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला.