९ अॉगष्ट क्रांतीदिनी शिक्षक भारतीचे राज्यव्यापी आंदोलन

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.6ऑगस्ट):-शिक्षक भारती संघटनेतर्फे दि.९ अॉगष्ट २०२१ रोजी क्रांतीदिनी शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना घेऊन शिक्षक भारती एकदिवशीय राज्यस्तरीय आंदोलन करित आहे.या आंदोलनात प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक,आश्रमशाळा,विशेष शाळांमधील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी सहभाग घेणार आहेत.हे आंदोलन शिक्षण उपसंचालक,शिक्षण निरीक्षक,शिक्षणाधिकारी यांचे कार्यालयासमोर होणार आहे.

या आंदोलनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.सन २००५ पूर्वी व नंतर नियुक्त कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी,वस्तीशाळा शिक्षकांची मूळ नियुक्ती दिनांकापासूनची सेवा जोडण्यात यावी,सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती (१०, २०, ३०) योजनेचा लाभ इतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना देण्यात यावा. तसेच ही योजना लागू होईपर्यंत शिक्षकांना वरीष्ठ व निवडश्रेणी विनाअट देण्यात यावी,प्राथमिक पदवीधर / विषय शिक्षकांना सरसकट ४३०० ग्रेड पे वेतन देण्यात यावे,आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तात्काळ राबवावी.

कोकण विभागाचा समावेश करावा. बदल्या १०० टक्के कराव्यात,जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया राबवण्यात यावी.ही बदली प्रक्रिया राबवत असता विस्थापित, रँडमराऊंड मधील शिक्षक, महिला शिक्षिका, एकल शिक्षक, पती पत्नी एकत्रितकरण, दुर्गम भागातील शिक्षक यांचा प्राधान्याने विचार व्हावा.विनंती बदलीसाठी संदर्भ दिनांक ३० जून आणि सेवा ३वर्षे ग्राह्य धरण्यात यावी,शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येवू नयेत.कोविड १९ च्या ड्युटीतून कार्यमुक्त करावे.कोविड आजाराने बाधीत झालेल्या शिक्षकांना विशेष रजा मंजूर करण्यात याव्यात.कोविड आजाराने मृत्यू पावलेल्या शिक्षकांना विमाकवच ५०लाख रू रक्कम तात्काळ देण्यात यावी,राज्यातील सर्व शिक्षकांचे पगार 1तारखेस व्हावे यासाठी CMP प्रणाली सुरू करण्यात यावी, BDS प्रणाली तात्काळ कार्यान्वित करण्यात येवून भविष्य निर्वाह निधी चे प्रस्ताव मंजूर करावेत,सावित्रीबाई फुले-फातिमा शेख शिक्षक कुटुंब कॅशलेस आरोग्य योजना त्वरीत लागू करा.

वैद्यकीय प्रतीपूर्ती ची देयके निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषद यांना अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा,मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक यांची पदोन्नती प्रक्रिया त्वरित राबवण्यात येवून मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांची रिक्त पदे भरण्यात यावी,केंद्रप्रमुख यांना १६५० कायम फिरती प्रवास भत्ता देण्यात यावा. ज्या जिल्ह्यात वसुली सुरू आहे ती वसुली तात्काळ थांबवावी,२०१४ नंतरचे सर्वच अभावीत केंद्रप्रमुख यांना कायम करण्यात यावे,केंद्रप्रमुख पद हे जिल्हा तांत्रिक सेवा गट क मध्ये समावेश करण्यात यावा,जिल्हा परिषद अंतर्गत मृत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना / वारसांना अनुकंपातत्वावर तात्काळ नियुक्ती देण्यात यावी,अप्रशिक्षित शिक्षकांची अप्रशिक्षित सेवा ग्राह धरून वरिष्ठ वेतन श्रेणी देण्यात यावी,२० पटापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येऊ नयेत,मुलींच्या उपस्थिती भत्त्यात वाढ करुन प्रतिदिन १० रुपये करण्यात यावा,६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना मोफत गणवेश देण्यात यावा,आदिवासी व नक्षलग्रस्त भागामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी व प्रोत्साहन भत्ता विनाअट सुरू ठेवण्यात यावा.

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतन वाढ देण्यात यावी,७ वा वेतन आयोगानुसार शिक्षकांना ०१/०१/२०१६ नंतर मिळणाऱ्या चटोपाध्याय वेतनश्रेणीत अत्यल्प वाढ होत आहे.तसेच प्रा.पदवीधर शिक्षकांना ६व्या वेतन आयोगात प्राथमिक शिक्षका पेक्षा ११०रू बेसिक व १००रू ग्रेड पे जास्त असताना ही ७व्या वेतन आयोगात प्राथमिक शिक्षका पेक्षा कमी वेतन मिळत आहे. वरील त्रुटी बक्षी समिती खंड दोन अहवाल मध्ये दुरूस्ती व्हावी आदी मागण्यांचा समावेश आहे.

या आंदोलनात जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन शिक्षक भारती नागपूर विभागीय सरचिटणीस तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरेश डांगे,विभागीय सल्लागार रावन शेरकुरे,संघटक रविंद्र उरकुडे,जिल्हा कार्याध्यक्ष जब्बार शेख,सरचिटणीस नंदकिशोर शेरकी,सल्लागार धनराज गेडाम,दिवाकर लखमापुरे,राजाराम घोडके,राजेश घोडमारे,विरेनकुमार खोब्रागडे,संघटक विलास फलके,प्रसिद्धीप्रमुख विजय मिटपल्लीवार,माध्यमिकचे भास्कर बावनकर,कार्यवाह राकेश पायताडे,आश्रमशाळा अध्यक्ष बजरंग जेनेकर,दादाजी झाडे,विशेष शाळा विभागाचे अध्यक्ष महेश भगत,सचिव रामदास कामडी,पद्माकर मोरे,खाजगी प्राथमिकचे राबिन करमरकर,निर्मला सोनवने,रंजना तडस,माधुरी पोंगळे आदींनी केले आहे.