ग्रामसेवक संघटनेचे पंचायत समिती जिवती येथे काळ्या फिती लाऊन धरणे आंदोलन

20

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

जिवती(दि.7ऑगस्ट):-ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजना राबविणारा ग्रामसेवक हा ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा आसून गाव विकासाची धुरा सांभाळून विकास कामात महत्वाची भूमिका बजावत असतो परंतु गाव गाड्याच्या राजकारणात नेहमी ग्रामसेवक भरडला जात असून त्यातूनच त्याला शिवीगाळ करणे, मारहाण करणे, धमक्या देने, अपमानास्पद वागणूक देणे आसे प्रकार होत आहेत. याचाच जाहीर निषेध म्हणून संघटनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन तालुका शाखा जिवती यांच्या वतीने पंचायत समिती जिवती येथे संघटनेचे अध्यक्ष श्री लक्ष्मण मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली काळ्या फिती लाऊन धरणे आंदोलन करण्यात आले.

वरोरा तालुक्यातील अटमुरडी ग्रामपंचायत चे ग्रामसेवक श्री गोपीचंद खानेकर या ग्राम सेवकाला ग्रामपंचायत मध्ये गावातील व्यक्ती कडून मारहाण करण्यात आली. संबंधीत आरोपी वर गुन्हा दाखल होऊन सुद्धा आरोपीला अटक करण्यात आली नाही. या गंभीर घटनेच्या निषेधार्थ जिवती तालुका ग्रामसेवक संघटने कडून काळ्या फिती लाऊन निषेध नोंदविण्यात आला तसेच आरोपीला तात्काळ अटक करावी या मागणी साठी तालुका संघटनेच्या वतीने गट विकास अधिकारी पंचायत समिती जिवती यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ, संघटनेचे सचिव बाबाराव पोडे, संजय आत्राम, विनोद शेरकी, सचिन आदे, संजय ढोने, प्रकाश बोरचाटे, विजय पचारे, पुरुषोत्तम मिश्रा, प्रफुल गायकवाड, प्यारेलाल दहिवले, कु शालू शेडमके, कु स्मिता वऱ्हाडे, सुनील बांगरे, संजय आडे, अजय राऊत इत्यादी व इतर ग्रामसेवक बांधव मोठया संख्येने उपस्थित होते