म. रा. अपंग कर्मचारी संघटना बुलडाणा व अमरावती वतीने दिव्यांग पदोन्नती व इतर मागण्याचे निवेदन विभागीय आयुक्त अमरावती यांना सादर

27

✒️प्रतिनिधी बुलढाणा(मनोज नगरनाईक)

बुलढाणा(दि.8ऑगस्ट):-महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना मुंबई 32 चे राज्यध्यक्ष रविद्र पाटिल व राज्य सचिव परमेश्वर बाबर साहेब यांचा मार्गदर्शना खाली जिल्हा -शाखा बुलडाणा वअमरावतीच्या वतीने अमरावती मा.विभागीय आयुक्त अमरावती श्री पियुष सिंह , यांना दिव्यांग अधिकार कायदा २०१६ , नुसार शासन सेवेतील पदावर दिव्यांग 4% आरक्षण विहित केल्यानुसार मा.उच्च न्यायालय मुंबई येथे रिट याचिका क्र 6819/2021 मधील आदेशा नुसार शासनाने माहे जून व जुलै 2021मधे विविध शासन निर्णय काढून दिव्यांग अधिकारी /कर्मचा-यांची स्वतंत्र सेवा ज्येष्ठता करून 100%पदोन्नती तात्काळ करणे बाबत सूचित केल्याप्रमाणे कार्येवाही व्हावी.

दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांना सहाय्यक तंत्रज्ञान साधने व उपकरणे उपलब्ध करून द्यावी , दरवर्षी प्रत्येक आस्थापना मध्ये स्वतंत्र सेवाजेष्ठता सूची प्रसिद्ध करण्यात यावी, अपंग (दिव्यांग )कर्मचारी 2005 पुर्वी चा असो किंवा नंतर असो त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, प्रत्येक कार्यालयात अपंग (दिव्यांग) अधिनियम2016 कलम 230 नुसार दिव्यांग तक्रार व मार्गदर्शन अधिकारी यांची नेमणूक करून फलक लावण्यात यावा, आदी विषयावरील प्रलंबित प्रश्न मांडण्यात आले.

मा.विभागीय आयुक्त यांना निवेदन देताना दिव्यांग संघटना बुलडाणा चे जिल्हा सहसचिव श्री किशन केने मानेगावकर, अमरावती जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र दीक्षित, बुलडाणा संघटना चे पदाधिकारी श्री संजय बनगाळे नायब तहसीलदार , श्री श्याम भांबरे नायब तहसीलदार, श्री , प्रवीण डोंगरे, श्री आर पी चतुर , अमरावती जिल्हा उपाध्यक्ष कु.शालिनी बोरखडे जिल्हासचिव किशोर मालोकार, , कपिल हडाले, कार्याध्यक्ष चंद्रकांत मामनकर, जिल्हा सहसचिव गौतम विरघट ,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नितिन गायकी , जिल्हा कोषाध्यक्ष युवराज थोरात महिला प्रतिनिधी साधना पंचभाई सदस्य मुरलीधर बोभाटे अमरावती तालुकाध्यक्ष श्री विशाल धोटे,अमरावती तालुकासचिव श्री मंगेश खंडारे आदी संघटनेचे म.न पा सदस्य श्रीधर हिवराळे , अमोल साकुरे, रवि खडसे ,इरशाद खान रऊफखान , साजीद हुसैन , गुणसागर गवई , अजय चव्हाण , धिरज धोरधळे, हरजेश बांबल, रणजित नरोडे , रमेश पातुडैकर , मंगेश भावे , अजय वाढोणकर व मा. विभागीय आयुक्त यांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष राजेद्र दिक्षित जिल्हासचिव किशोर मालोकार जिल्हा उपाध्यक्ष कु शालिनी बोरखडे , ह्यांनी मिळुन सामुहिक निवेदन सादर केले व यावेळी उपस्थित होते.

यावेळी दिव्यांग कर्मचाऱ्यांना चा पदोन्नती, दिव्यांग कर्मचारी यांना सहायक तंत्रज्ञान साधने व उपकरणे त्वरित उपलब्ध करून द्यावीत, दिव्यांग कर्मचारी यांची विभागनिहाय स्वतंत्र सेवाज्येष्ठता यादी दरवर्षी प्रत्येक आस्थापना मध्ये प्रसिद्ध करण्यात यावी, अपंग (दिव्यांग )कर्मचारी 2005 पुर्वी चा असो किंवा नंतर असो त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, दिव्यांग कर्मचारी यांना4% चार टक्के प्रमाणे पदोन्नती देण्यात यावी, प्रत्येक कार्यालयात अपंग (दिव्यांग) अधिनियम 2016 कलम 23 नुसार दिव्यांग तक्रार व मार्गदर्शन अधिकारी नेमून त्याबाबत चा फलक लावण्यात यावा, आदी विषयावरील प्रलंबित प्रश्न वर , मा .विभागिय आयुक्त मा.पियुष सिंह यांनी सकारात्मकता प्रतिक्रिया दाखविली आहे.त्यामुळे संघटनेच्या वतीने बुलडाणा जिल्हा सहसचिव किशन केणे मानेगावकर , अमरावती जिल्हाध्यक्ष राजेद्र दिक्षित कडुन त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले*.