व्हॉट्सएप च्या ग्रुप चा रक्तसेवा साठी डिजिटल वे

21

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो.9823995466

उमरखेड(दि.7ऑगस्ट):-वर्ष भरात विविध महुर्तावर रक्तपीढ़यानच्या माध्यमामधुन मोठ्या प्रमाणात रक्त संकलन केले जाते ,पन एन वेळेवर गर्जुना रक्त मिळाले नाही तर अनेक जीव गमवावे लागतात,कधी कधी तर रक्ताचा व्यवसाय ही केला जातो. यालाच पर्याय म्हणून उमरखेड़ च्या युवकानी व्हॉट्सएप ऍप च्या माध्यमामधुन रक्तदानाचा “डिजिटल वे” शोधून त्याला रक्तपेढ़ी चे रूप दिले व गर्जुना वेळेत रक्तसेवा उपलब्ध करुण देण्याच्या उद्देशाने युवकानी मागील बऱ्याच वर्षा पासून व्हॉट्सएप ग्रुप च्या माध्यमातून डिजिटल रक्तसेवा करत आहेत.
मैत्री जनसेवा बहुद्देशिय संस्था च्या वतीने “मैत्री जनसेवा” व्हॉट्सएप ग्रुप च्या माध्यमातून ही सेवा देण्यात येत आहे.

आज देश डिजिटल माध्यमा कड़े अधिक वळत चाला आहे.
या माध्यमामधुन जग जवळ येत आहे. तसेच समाज माध्यमा मुळे एकमेकांशी संपर्क करने सोइसकर होत आहे.
या सुविधेच्या माध्यमातून काही युवकानी रक्तदानाची चळवळ उभी करुण गर्जुना रक्त पुरवठा करण्याचे निस्वार्थ धेय हाताशी घेतले आहे.”मैत्री जनसेवा बहुद्देशिय संस्था” ही रक्तदान क्षेत्रात कार्य करणारी संस्था असून सदस्य व युवकाच्या सहकार्याने ग़रजु रुग्णाला वेळेवर रक्तपुरवठा किव्हा रक्तदाते उपलब्ध करुण देण्याचे कार्य करत आहे.या संस्थे तील युवकानी व्हॉट्सएप व फेसबुक च्या माध्यमामधुन लिंक शेयर करुण आपल्या चळवळी ची व्यापकता वाढवीली आहे.

सध्या ऑनलाइन सम्पर्क मधून डिजिटल रुपात ग्रूप तर्फे थेट रक्तदाते किव्हा रक्त उपलब्ध करुण दिल्या जात आहे.
या समुहात कॉलेज विद्यार्थी, समाजसेवक,रुग्णसेवक,पोलिस वर्ग,पत्रकार, गणेश मंडळ, अश्या अनेकांचा सहभाग नोंदविले ला आहे.त्या मुळे अनेक गरजु रुग्नाला जीवनदान मिळत आहे.
ही चळवळ देशव्यापी करण्या साठी रक्तदाते प्रयत्न रत आहे.”मैत्री जनसेवा” वॉट्सऐप ग्रुप आता पर्यन्त अनेक गर्जु रुग्णान साठी भाग्य विधाता ठरला आहे. गर्भवती महिला,कोरोना पेशंड, डेंग्यू, अपघाती रुग्ण, तसेच इतर आज़ारी रुग्नणा रक्तदाते किव्हा ब्लड बैंक डोनर कार्ड च्या माध्यमामधुन रक्त उपलब्ध करुण त्यांची निस्वार्थ सेवा करीत आहे.

●चौकट- “व्हॉट्सएप ग्रुप वर माहिती अदान प्रदान”
ज्या रुग्नणा रक्ताची गरज आहे अशा रक्तदात्यांची माहिती ग्रुप च्या माध्यमामधुन इतर रक्तदात्या पर्यंत पोहोचवली जाते.

आणि ज्यानी रक्तदान केले अशा रक्तदात्यांचा उत्साह वाढविन्या साठी ग्रुप वर त्याचे कौतुक केले जाते.