माण बाजार समिती वर भाजप रासप युती चा झेंडा; 10 विरूद्ध 7 फरकाने विजयी;आमदार जयकुमार गोरे यांचे पुन्हा वर्चस्व

31

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड,)मो:-9075686100

म्हसवड(दि.8ऑगस्ट):-बहुचर्चित माण बाजार समितीचा निकाल आज जाहीर झाला बाजार समितीसाठी दि.7 ऑगस्त रोजी मतदार झाले होते.माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक ही अतिशय चुरशीची झाली या अटीतटीच्या निवडणुकीत आ. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष व रासप युतीने 17 पैकी 10 जागा मिळवून सत्ता कायम राखली.तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आघाडी ला 7 जागा मिळाल्या.

बाजार समितीच्या या निवडणुकीत विजयी उमेदवार
सोसायटी सर्वसाधारण मतदार संघातून विजयी
जगदाळे सूर्याजी विश्वासराव ( 306 राष्ट्रवादी ),बनगर अर्जुन आगतराव (306 भाजप व रासप),देशमुख विलास आबा (301भाजपव रासप),सस्ते दत्तात्रय पांडुरंग (287भाजपव रासप),यादव रमेश दगडू (285भाजपव रासप), कदम रामचंद्र गणपती (284 राष्ट्रवादी),भोसले कुंडलिक दादासो (283 राष्ट्रवादी )सोसायटी मतदार संघ महिला राखीव मधून जाधव निर्मला नंदकुमार ( 314 भाजप व रासप),वीरकर वैशाली बाबासो 302 (भाजप व रासप)
सोसायटी मतदार संघ इतर मागास प्रवर्ग मधून राऊत अमोल साहेबराव (308 भाजप व रासप)
सोसायटी मतदार संघ विमुक्त जाती जमाती मधून
झिमल रामचंद्र श्रीरंग (306 राष्ट्रवादी )
सोसायटी.7 आमदार गोरे पार्टी , राष्ट्रवादी काँग्रेस 4
ग्रामपंचायत मतदार संघातून विजयी उमेदवार काळे बाळकृष्ण किसन (420 राष्ट्रवादी ),योगेश महादेव भोसले ( 366 राष्ट्रवादी )
ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मधून तुपे रविंद्र पोपट ( 371भाजप व रासपग्रामपंचायत आर्थिक दुर्बल मधून
पुकळे ब्रह्मदेव तुकाराम (385 भाजप व रासप)
व्यापारी मतदार संघ विजयी उमेदवार मधून किसन चंद्रोजी सावंत (195 राष्ट्रवादी ), शेखर मोतीलाल गांधी (153 भाजप)
सोसायटी मतदार संघ या मधून विजयी उमेदवार ला 283 मतदान मिळाले. व पराभूत उमेदवाराला 281 मते मिळाली.त्यामुळे फेरमत मोजणी ची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत आ.जयकुमार गोरे यांच्या गटाला 10 जागा आणि राष्ट्रवादी,कॉग्रेस व अनिल देसाई यांच्या गटाला मिळून 7 जागांवर समाधान मानावे लागले यात नुकसान झाले ते शिवसेना नेते शेखर गोरे यांचे मोठे नुकसान झाले त्याच्या पेनेलचा एकही उमेदवार निवडून आला नाही त्यांमुळे शेखर गोरे यांना मोठा धक्का मानला जातोय.
माण बाजार समितीच्या निवडणुकीत आ.जयकुमार गोरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती त्यांनी एक हाती सत्ता मिळवली बाजार समितीवर एकूण 18 संचालक निवडून द्यायचे होते यासाठी 2065 मतदार होते कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या निवडणुकीला मुदतवाढ देण्यात आली होती बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 98% मतदान झाले होते.