प्रज्ञासूर्य स्वयंचलित फाउंडेशन ग्रुप तर्फे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र परिसरात करण्यात आले वृक्षारोपण

35

✒️विशेष प्रतिनिधी(अमोल उत्तम जोगदंडे)

उमरखेड(दि.9ऑगस्ट):- तालुक्यातील धनज येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र धनज येथील परिसरात जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. प्रज्ञासूर्य स्वयंचलित फाउंडेशन ग्रुप तर्फे जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र परिसरात स्वच्छता अभियान राबवून वृक्षारोपण करण्यात आले .लावलेला रोपाची झाडे होईपर्यंत संपूर्ण जबाबदारी आम्ही व आमचा ग्रुप मेंबर घेणार आहे .असे या संस्थेने सांगितले आहे .

तसेच आजपासून आमच्या संस्थेतर्फे पर्यावरणाच्या रक्षणासाठी आम्ही नेहमी तत्पर राहू .अशे या संस्थेने सांगितले आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रघुवीर जाधव, उपाध्यक्ष अजय पठाडे ,सचिव प्रतिक महाजन, सहसचिव प्रमोद गुहाडे, कोषाध्यक्ष विरेन डोंगरे, मार्गदर्शक व सल्लागार अमोल कुरकुटे , व सदस्य तेजस डोंगरे ,किशोर मोडक ,प्रविन राठोड, समाधान साबळे, अशिष डोंगरे, विशाल उगले, शंकर वाळके, राजेश वाळके ,कुलदीप साबळे ,वैभव वाळके ,दर्शन चिरमाडे ,प्रशांत पठाडे कुणाल जोगदंडे ,पंचशील जोगदंडे इत्यादी उपस्थित होते.