विश्वकर्मा वंशिय समाज सघंटणेच्या मराठवाडा अध्यक्ष पदी नारायण पांचाळ

25

✒️विषेश प्रतिनिधी(शिवानंद पांचाळ नायगांवकर)

नांदेड(दि.९ )ऑगस्ट):-ता. कंधार कुरुळा सर्कल मधिल दिग्रस खुर्द येथिल नारायण पांचाळ दिग्रसकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन नारायण पांचाळ यांची मराठवाडा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

या अगोदर नारायण पांचाळ यांनी सलग दोन वेळेस जिल्हाध्यक्ष तर एक वे मराठवाडा युवा अध्यक्ष या पदावर काम केले आहेत. यावेळी उपस्थितीत संघटणेचे प्रदेश अध्यक्ष श्री. दिलीपजी दिक्षीत साहेब ,मुख्य निरिक्षक शामजी दाभडकर साहेब ,सरचिटणिस संजयजी बोराडे साहेब , राज्य उपाध्यक्ष अरुणजी भालेकर ,राज्य कोअर कमीटी सदस्य श्रीधरजी पांचाळ आदी पदाधिकारी व समाज बांधव यांच्या उपस्थितीत व सर्वाच्या सहमतिने बिनविरोध पणे निवड करुन नियुक्ती देण्यात आली त्यांच्या या निवडी बद्दल नांदेड , हिंगोली, परभणी ,लातुर सर्व स्तरातून शुभेच्छा मिळत व त्यांचे कौतुक केले जात आहे