भंगाराम तळोधी येथे सर्वात मोठी चोरी

31

🔺घरी कुणी नसल्याचा फायदा घेत केले गुपचूप काम

✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8698648634

गोंडपिपरी(दि.10ऑगस्ट):-गोंडपिपरी तालुक्यात चोरीचे प्रमाण खूप वाढत आहे. अशातच भंगाराम तळोधी येथील प्रतिष्ठित व्यापारी व सामाजिक कार्यकर्ता श्री. प्रमोद सावकार आईंचवार यांच्या घरी आज पर्यंतचे सर्वात मोठी चोरी झाली आहे. ही घटना दिनांक 3/8/2021 रोजी मंगळवारला घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्या दिवशी श्री. प्रमोद सावकार आईंचवार हे गावाला गेले होते. याची माहिती चोरट्यांना कळली. त्यादिवशी त्यांचा मुलगा दुसऱ्यांच्या घरी झोपायला गेला ही माहिती चोरट्यांना कळली. ते गावाला गेले व त्यांचा मुलगा दुसऱ्यांच्या इथे झोपण्यासाठी गेला आहे मग आता काय! चोरट्या साठी यांसाठी सर्व घर सुनसान होता आणि चोरी करणारे सुद्धा याचीच वाट बघत होते.

मंगळवारला घरी कोणीच नाही ही माहिती कळताच त्यांनी आपला गेम तयार केला. शेजारील रात्री सर्व झोपले असता त्यांच्या घरात शिरून घरी असलेले दागिने (जवळपास पाच लाखांचे) व रोख रक्कम (अंदाजे पन्नास हजार) घेऊन चोरटे फरार झाले दुसऱ्या दिवशी मुलगा घरी येऊन बघितला तर त्याला शंका आली मग घरचे दागिने व पैसे बघितल्यास सर्व खाली झाले होते. मग ही सर्व माहिती आपल्या वडिलांना सांगितले त्यांचे आई-वडील येऊन पोलीस स्टेशन गोंडपिपरी येथे रिपोर्ट दिली. एवढी सारी रक्कम चोरी झाल्याने श्री प्रमोद सावकार आईंचवार यांच्या घरचे निराशाजनक अवस्थेत असून खूप मोठ्या चिंतेत पडले आहेत अशा मोठ्या चोरीने भंगाराम तळोधी येथील वातावरण गंभीर असून जवळपास गावागावांमध्ये ही भितीचे वातावरण पसरले आहे.