विज पडुन शेतकऱ्याचा मृत्यू

23

🔺ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.10 ऑगस्ट):-बाेडधा येथील प्रतिष्ठित नागरिक तथा बाेडधा येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आनंदराव पा. ठाकरे यांचा आज सायंकाळी ५ वा. शेताजवळ रस्त्यावर विज पडुन जागीच मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार,बाेडधा येथील आनंदराव पा. ठाकरे(वय ५५)हे शेतावर काम करण्यासाठी गेले असता. घराकडे येतांना रस्त्यावरचं विज पडुन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ते परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती हाेते. व बाेडधा येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून ते खुप वर्षापासून कार्यरत हाेते.त्यांच्या पश्चात विवाहित एक मुलगा व दाेन मुली असुन पत्नी, सुन,नातवंडे, जावई असा बराच माेठा परिवार आहे. ते खुप मनमिळावू असल्याने त्यांच्या अकाली जाण्याने परिसरातील नागरिकांवर शाेककळा पसरली आहे.