✒️अशोक हाके(बिलोली,ता.प्र.)मो.नं.9970631332
बिलोली(दि.13ऑगस्ट):-मागील सात वर्षापासून नगर परिषद कुंडलवाडी येथे सफाईदार व इतर काम करणाऱ्या कामगारांना ठेकेदार उपलब्ध नसल्यामुळे कामावरून कमी केले होते,तेव्हा कमी केलेल्या कामगारांनी सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांची भेट घेऊन युनियन स्थापन केली व युनियनच्या वतीने दिनांक १३ आॕगस्ट सकाळी ११.३० वाजता पासून न.प.कुंडलवाडी समोर बेमुद्दत ठिय्या व कामगारांचे अमरण उपोषण सुरू करण्यात आले होते.
तेव्हा मुख्याधिकारी श्री ज्ञानेश्वर ठोंबरे व नगराध्यक्षा यांचे प्रतिनिधी नरेंद्र जिठावार नगरसेवक सुरेश कोंडावार,सचिन कोटलावार,शेख मुख्त्यार,शंकर गोनेलवार व डॉ.प्रशांत सब्बनवार तसेच पत्रकार माजित नांदेडकर,अशोक हाके,सिध्दार्थ कांबळे, अमरनाथ कांबळे यांच्या समक्ष नगराध्यक्षांच्या कक्षा मध्ये युनियन प्रतिनिधी सोबत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली.बैठकीत कॉ.गायकवाड यांनी कामगारांना कामावर घ्यावे,वेतन चेक द्वारे किंवा बँकेतून करावे.किमान वेतनाची पुर्तता करावी. या प्रमुख मागण्यासह इतरही मागण्या सोडविण्याची विनंती मुख्याधिकारी यांना केली.
सुरवातीला बघूया वगैरेची भाषा मुख्याधिका-यांनी बोलून दाखविली परंतु युनियन प्रतिनिधी आक्रमक झाल्याने व लोक प्रतिनिधीनी मध्यस्ती केल्याने लेखी आश्वासन देण्याचे मुख्याधिका-यांने मान्य केले व लेखी पत्र स्विकारून ३५ कामगारांचे अमरण उपोषण व ठिय्या आंदोलन तुर्तास समाप्त करीत असल्याचे स्थानिक समितीचे अध्यक्ष कॉ.पेंटाजी तोटावार व सचिव कॉ.मारोती हातोडे यांनी घोषित केले.
आंदोलनाचे नेतृत्व कॉ.मारोती केंद्रे,कॉ.संजय साळुंके, कॉ.नवज्योत कपाळे,कॉ.नागेश श्रीरामे, कॉ.साईप्रसाद येपूरवार, कॉ.शिवकुमार खांडरे,कॉ.दिलीप वाघमारे, कॉ.सुरेश पोरडवार आदींनी केले.
—————————————
कुंडलवाडी नगर परिषदेत मागील पाच ते सात वर्षापासून ३९ सफाईदार व इतर कामगार कार्यरत होते.कोरोना -१९ काळात जीवाची पर्वा न करता उपरोक्त कामगारांनी फ्रंट वर्कर म्हणून आपले कार्य चोखपणे बजावले आहे.परंतु ठेकेदार उपलब्ध नसल्याचे कारण देत संबंधित सर्व कामगारांना मागील सहा महिन्या पासून कामावरून कमी केले होते. आज सीटूच्या संघर्षाने व आंदोलनामुळे सर्व कामगारांना रूजू करून घेण्याचे लेखी आश्वासन मुख्याधिकारी न.प.कुंंडलवाडी श्री ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी दिले. आम्ही त्यांचे व नगराध्यक्ष तसेच पत्रकार,नगरसेवकांचे आभारी आहोत – कॉ.गंगाधर गायकवाड