रस्ता दुरुस्तीच्या कामावरील अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी सहकार्य करावे – निरस

24

🔹ग्रामस्थांकडून अधिकाऱ्यांचा सत्कार

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.13ऑगस्ट):-मुख्य कॅनल बांधल्यापासून आज पहिल्यांदाच बाजूच्या मुख्य रस्ता दुरुस्तीचे काम सुरू होत आहे ,या कामावरील अधिकारी कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी सहकार्य करून आपल्या गावचा विकास साधावा असे आवाहन पडेगाव ग्रामपंचायतचे सर्वेसर्वा नागनाथराव नीरस यांनी केलं.
नागपंचमीच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या कामाच्या वेळी अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. माजलगाव कालवा स्टेशन वडगाव कडून येत पडेगाव मार्गे गंगाखेड कडे जातो .त्या मुख्य रस्त्याच्या बाजूचा रस्ता तयार झाला तेव्हापासून आजपर्यंत एकदाही त्याची दुरुस्ती झालेली नव्हती. त्यामुळे या रस्त्यावर खूप मोठमोठे खड्डे पडले होते.

पावसाळ्यात परिसरातील शेतकऱ्यांना आपापल्या शेताकडे जाणे येणे अवघड झाले होते. ग्रामस्थांनी ही बाब परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या कानावर घालत हा रस्ता दुरुस्तीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करावा अशी विनंती केली होती. यावरून मागील एक महिन्यापासून सखाराम बोबडे यांनी शासन प्रशासन स्तरावर पाठपुरावा केला होता. पडेगाव ,खादगाव, मरगलवाडी ,स्टेशन वडगाव येथिल शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले .आज नागपंचमीच्या दिवशी या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली. यावेळी पडेगाव ग्रामस्थांनी माजलगाव कालवा विभागाचे अधिकारी सुरेंद्र वाठोरे यांचा प्रतिनिधिक स्वरुपात सत्कार केला.

रस्त्याचे काम होईपर्यंत परिसरातील शेतकऱ्यांनी या रस्त्याने आपली बैलगाडी, ट्रॅक्टर न आणून सहकार्य करावे असे आवाहनही नीरस यांनी केले. शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला हा रस्ता दुरुस्तीसाठी सहकार्य केल्याबद्दल माजलगाव कालवा विभागाचे अधिकारी प्रेमसिंह शिसोदे, वरिष्ठ अधिकारी श्री ठोंबरे, कार्यकारी अभियंता सलगरकर, विभागीय अभियंता निरगुडे आदीसह याकामी मदत करणारे ग्रामस्थ, तहसीलदार स्वरूप कंकाळ, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांचे आभार मानले. यावेळी सखाराम बोबडे,नागनाथ नीरस, सहकारी गायकवाड आदींची उपस्थिती होती. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थ आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.