धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाच्या वतीने माळी समाज पंच मंडळाचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान

35

✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धरणगांव(दि.15ऑगस्ट):- स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला धरणगांव येथील तालुका अधिकृत पत्रकार संघटनेच्या वतीने समस्त माळी समाज पंच मंडळाचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकशाहीचे ता. प्रतिनिधी विनोद रोकडे यांनी केले. यावेळी संत सावता महाराज समाज सुधारणा मंडळाचे ( मोठा माळी वाडा ) नवनियुक्त अध्यक्ष – विठोबादादा माळी यांचा सन्मान अधिकृत तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष ऍड.वसंतराव भोलाणे यांनी शाल – पुष्पगुच्छ देऊन केला.

याच प्रमाणे उपाध्यक्ष – निंबाजी माळी यांचा सन्मान तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सतीश शिंदे, कोषाध्यक्ष – विनोद माळी सर यांचा सन्मान जेष्ठ पत्रकार विजयकुमार शुक्ला, सचिव – गोपाल माळी यांचा सन्मान बाळासाहेब प्रभूदास जाधव, सहसचिव – डिगंबर महाजन यांचा सन्मान लोकपत्रिकाचे मुख्य संपादक तथा लोकमतचे पत्रकार किरण चव्हाण, पंच – विजय महाजन यांचा सन्मान ऍड.हर्षल चौहान, जेष्ठ पंच व मार्गदर्शक दशरथ बापू महाजन यांचा सन्मान विनोद रोकडे यांनी शाल – पुष्पगुच्छ देऊन केला.याप्रसंगी गुलाबरावजी वाघ यांनी सांगितले की, पत्रकार संघटना कुणाचाही सत्कार – सन्मान करीत नाही.

परंतु आमच्या माळी समाजाच्या कार्याची दखल पावती म्हणून तालुका अधिकृत पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ऍड. वसंतराव भोलाणे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पत्रकार बांधवांनी मोठा माळी समाज मंदिरात आमच्या पदाधिकाऱ्यांचा अभूतपूर्व सन्मान केला त्याबद्दल मी माळी समाजाच्या घटक म्हणून सर्व पत्रकार बांधवांना मी धन्यवाद, आभार व्यक्त न करता मी आपल्या ऋणात राहणे पसंत करतो. असेही श्री.वाघ यांनी सांगितले.

याप्रसंगी अधिकृत पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष – साईमतचे ऍड.वसंतराव भोलाणे, रावा आप्पा माळी, ऍड.संजय महाजन, शौर्य मराठी चॅनलचे विजयकुमार शुक्ला, लोकनायक न्यूजचे जितेंद्र महाजन, दिव्य मराठीचे बी.आर.माळी, पुण्यनगरीचे भगीरथ माळी, लोकपत्रिका न्युजचे मुख्य संपादक किरण चव्हाण, लोकमत चे आर.डी. महाजन, लक्ष्मण माळी, लोकशाहीचे विनोद रोकडे, महाराष्ट्र न्यूजचे संपादक सतीश शिंदे, लोकबातमीदारचे निलेश पवार, सामनाचे बाळासाहेब जाधव, महाराष्ट्र सारथीचे ऍड.हर्षल चौहान, बुलंद पोलीस टाइम्सचे योगेश पी.पाटील, देशदूतचे अधिकृत प्रेस फोटोग्राफर शैलेश भाटिया, लोकपत्रिकाचे पी.डी. पाटील, महाराष्ट्र न्युज चे दिनेश पाटील, विकास पाटील, विनोद बीजबीरे, बाळकडूचे प्रा.मंगेश पाटील, पुण्यप्रतापचे आबासाहेब राजेंद्र वाघ आदी पत्रकार बांधव व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदलाल महाजन, बबलू मराठे आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे सचिव आर.डी.महाजन यांनी केले तर आभार पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष सतीश शिंदे यांनी मानले.