पोलिस उपनिरीक्षक पेंदोरे विशेष सेवा पदकाने सन्मानीत

55

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.१५ऑगस्ट):-हल्ली हिंगणघाट येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक गिरधर पें‌दोरे हे ११३ बॅचचे पोलीस अधिकारी असून त्यांचा वर्धा जिल्ह्यातील रामनगर पोलिस स्टेशन येथे परिविक्षाधीन कालावधी पूर्ण झाला.नंतर त्यांची गडचिरोली जिल्ह्यात बदली करण्यात आली. यादरम्यान त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील पोलीस मदत केंद्र कोटमी येथे नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील तसेच दुर्गम भागात त्यांनी तीन वर्ष उत्कृष्ट सेवा बजावली आहे.

यादरम्यान त्यांनी दिनांक २५ मार्च,२०१८ रोजी मौजा मेंढरी गावाचे घनदाट जंगल परिसरात पोलीस व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार मारण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. त्याकरिता त्यांना दिनांक १ जून,२०१९ रोजी पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

श्री पेंदोर यांनी एक जहाल नक्षलवादाचे आत्मसमर्पण करून घेण्याची महत्वपूर्ण कामगिरी केली असून या काळात त्यांनी ५ भरमार बंदूकीसुद्धा जप्त केलेल्या आहेत. अशा प्रकारची उल्लेखनीय कामगिरी करीत नक्षलग्रस्त गडचिरोली क्षेत्रात तीन वर्ष उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक गिरधर लक्ष्मण पेंदोर यांना आज दि .१५ आॅगस्ट २०२१ रोजी विशेष सेवा पदकाने सन्मानित करण्यात येत आहे.अशा या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.