प्रहार दिव्यांग संघटनेने दिली मतीमंद बांधवांला दिली मायेची ऊब

32

✒️चांदू आंबटवाड(नायगाव तालुका प्रतिनिधी)मो.नं.9307896949

नायगाव(दि.15आँगस्ट):-गावातीलच गरीब ,निराधार, दिव्यांग,यांना कपडे व साहित्य वाटून अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी व 15 आँगस्ट साजरा करण्याचे आवाहन मा.राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी केले होते.त्यांच्याच अवाहनास प्रतिसाद देत काल स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नायगाव तालुक्यातील मौजे कुंटूर येथील मतीमंद बालाजी आनंदा डोके या बालकास प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने ब्लँकेट वाटप करून ईतर दिव्यांगांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी नांदेड जिल्हा सचिव श्री मारोती मंगरूळे साहेब, जिल्हा सहसचिव श्री चांदू आंबटवाड, नायगाव ता.अध्यक्ष श्री साईनाथ बोईनवाड यांनी दिव्यांगांना सखोल मार्गदर्शन केले. या छोटेखानी कार्यक्रमाला कुंटूर चे प्रहार शाखा प्रमुख श्री मल्हारी हैबत्ती महादाळे,गोविंद महादाळे, देऊबाई देवदे, गणेश शिनगारे, देवकाबाई गोदे,बाबू झुंजारे, जावेद चाऊस,गणेश कदम,मोहनाबाई डोके,अंजूबाई शिनगारे, शिरोळे सालेगावे अशोक वाघमारे व ईतर दिव्यांग बांधव हजर होते.