स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कॉलनीवासीयांनी दिले नगराध्यक्षांना निवेदन…..

33

🔹जी.एस. – कृष्णगीता – शांतिविजय नगर वासियांनी मांडल्या समस्या…

✒️धरणगांव प्रतिनिधी (पी.डी.पाटील)

धरणगांव(दि.16ऑगस्ट):- १५ ऑगष्ट, २०२१ रविवार रोजी जी.एस. नगर, कृष्णगीता नगर व शांतिविजय नगर वासियांनी धरणगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आबासाहेब निलेशजी चौधरी यांची भेट घेऊन तिन्ही कॉलनीतील विविध समस्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली.सर्वप्रथम जी.एस.नगर, कृष्णगीता नगर व शांतीविजय नगर मधील रहिवासी बांधवांनी पाण्याची पाईपलाईन, इलेक्ट्रीक पोल व त्यावरील स्ट्रीट लाईट , घंटागाडी, तिन्ही कॉलनीच्या रस्त्यासंदर्भात मुरूम टाकणे अशा विविध समस्या लोकनियुक्त नगराध्यक्ष आबासाहेब निलेश चौधरी यांच्या समोर मांडुन निवेदन देण्यात आले. यानंतर आबासाहेबांनी लगेच तात्काळ या सर्व तिन्ही कॉलनी वासियांच्या मागण्यांची पूर्तता होईल असे आश्वासन दिले.

याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, नगरसेवक किरण मराठे, विजय भाऊ महाजन, वासुदेव चौधरी, भरत चौधरी, अधिकृत पत्रकार संघटनेचे शहराध्यक्ष लक्ष्मण माळी, बाळासाहेब जाधव, विनोद रोकडे इ.पत्रकार बांधव तसेच कॉलनीतील जेष्ठ नागरिक गिरधर मोरे, बी.एम.सैंदाणे, प्रल्हाद विसपुते, महेंद्र सैनी, , राजेंद्र चौधरी, जे.एस.पवार, सुधाकर मोरे, राकेश महाजन, गोकुळ महाजन, अजय मैराळे, अरूण सोनवणे, बाळू अत्तरदे , सुनील तायडे, विनायक कांयदे, किशन राठोड, प्रल्हाद सुर्यवंशी, अनिल पाटील, सुरेंद्र सोनवणे, धनराज सुतार, गणेश झुंझारराव, अरुण सोनवणे, अशोक कोळी, मनोहर माळी , भिमराव मैराळे, सागर चौधरी, रवींद्र शिरसाठ, पी.डी.पाटील तसेच जी.एस.नगर व कृष्णगीता नगर व शांतीविजय नगर मधील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.