भयानक अपघात – वयस्कर महिला जागीच ठार तर सात वर्षीय मुलगी गंभीर जखमी

56

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभिड दि.16ऑगस्ट):- नागपूर ते आरमोरी रोडवर चालणारी टमाटर भरलेला टेम्पो (मीनी ट्रक)MH 33 T 2470 आज भरधाव वेग घेत असतांना अचानक ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने आज सकाळी जवळपास 6.45 वाजता भयानक अपघात झाला.

त्यात वयस्कर महीला सुगंधाबाई अलोने (60) यांचा जागीच मृत्यू झाला आणि सात वर्षांची चिमुकली कु. डिम्पल अमन मिसार हि गंभीर जखमी झाली असुन तिला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र नागभीड येथे उपचारासाठी हलविण्यात आले.सामोरिल तपास नागभीड पोलिस करित आहेत.