केज तालुक्यातील मौजे लाडेगाव येथील गायरान जमिनी वरून गेली कित्येक वर्ष चालू असलेला संघर्ष आज ही कायम…

53

🔺त्याच धर्तीवर 14आॅगस्ट रोजी झालेल्या तंट्यावरून इंजिनिअर विशाल धिरे व सहा जणांविरोधात कलम 395, 506 व काही कलमानुसार गुन्हे दाखल

✒️नवनाथ पौळ(बीड,अंबाजोगाई विभागीय प्रतिनिधी)मो:-8080942185

बीड(दि.16ऑगस्ट):-जिल्ह्यातील केज तालुक्यातील मौजे लाडेगांव येथे गेली कित्येक वर्षांपासून गावातील मागासवर्गीय कुटूंबे गायरान जमिनी अतिक्रमित करुन हंगामी पिके घेऊन उपजिविका भागवत आहेत.वेळोवेळी पिक पंचनामे व एक ईला नोंदी घेण्यात याव्यात यासाठी महसुल प्रशासन अर्थात तहसिलदार यांना अर्जाद्वारे विनंत्या करूण पिकपंचनामे करुन घेतले आहेत.मागिल वर्षी आपसातील अंतर्गत वादाचा मुद्दा उकरून काढून ग्रामपंचायत मध्ये प्राबल्य असलेल्या लोकांनी अतिक्रमित गायरान जमिनिच्या विरोधात ग्रामपंचायतीमध्ये एकमताने ठराव मंजूर करून त्या ठिकाणी वृक्षलागवडकरण्यासाठीचे ठराव घेतले गेले व येथून वादाची ठिणगी पडली व लाडेगांव येथील मागासवर्गीय लोकांबरोबरोबर झालेल्या वादात कित्येक बांधवांना मारहाण करूण जातिवाचक शिविगाळी करण्याच्या घटना व त्यावरून त्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे ही दाखल होण्याच्या घटना या गावात बर्याच वेळेस घडल्या आहेत.

सदरील गावातील अतिक्रमित गायरान जमिनिचा प्रश्न अतिक्रमण धारकांच्या विरोधातील लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करूण कोर्टाने त्या वेळेच्या जिआरनुसार लाडेगांव येथील गट नंबर 143 मधील सर्व अतिक्रमण महसुल प्रशासनाला काढून टाकण्यात येऊन मोजणी करूण बाॅंडरी आखून घेतली जावी असे निर्देश दिले असता मागिल 6-7 महिन्यापुर्वी महसुल प्रशासनाने कोर्टाने दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करता अतिक्रमण केलेल्या गायरान जमिनिवरील उभ्या पिकांची नासाडी करत पोलिस प्रशासनाच्या फौजेचा वाजवी वापर करत सदरील पिकांचे अतिक्रमण काढले परंतू गावातील सर्वे नं-143 मधील‌ गायरान जमिनिच्या शेजारील ज्या शेतकऱ्यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून बंगले ,घरे बांधलेली आहेत,पाण्याचे बोअरवेल, विहिरी आहेत ते अतिक्रमण प्रशासनाने काढले नाही असे निदर्शनास आले. त्यामुळे हा संघर्ष संपलाच नाही प्रस्थापित लोकांचे सुद्धा अतिक्रमण काढण्यासाठी मागणि जोर धरू लागली आमचं अतिक्रमण काढलं मग या लोकांचं का नाही हा प्रश्न लाडेगाव येथील मागासवर्गीय कुटूंबांनी महसुल प्रशासनाला विचारला तसं होणार नसेल तर आमच्या अतिक्रमित गायरान जमिनी आम्ही कसणारच असा पवित्रा घेत जमिनी वहिती केल्या.

ह्या वहिती केलेल्या जमिनीवरच दिनांक 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 वाटेच्या सुमारास सर्वे नं-143 मधील गायरान जमिनितील उभ्या पिकात मुद्दामहून त्या गावातील जगजीवन विठ्ठल आंबाड हे व्यक्ती गायी चारू लागले ते गायी चारीत असताना अतिक्रमण धारक रामधन धिरे यांनी सदरील व्यक्तीला आमच्या पिकांमध्ये जणावरे का चारतोस असे विचारले असता समोरील व्यक्तीने तुझ्या बापाची जमिण आहे का असे म्हणत जातिवाचक शिविगाळी करूण त्यांचे मुलं विवेकानंद जगजीवन अंबाड, श्रीकांत जगजीवन आंबाड यांना बोलावून घेत रामधन धिरे यांना गचुरं धरून खाली पाडत जबर मारहाण केली व खालील पाडून रामधन धिरे यांच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न या तिघांनी केल्याचा प्रकार पिडितांनी युसुफ वडगांव येथील पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या पोलिसांत तक्रारीवरून उघड झाला आहे. सदरील व्यक्ती तिघांविरुद्ध पोलिसांनी 307,323,504,506 भादविसह अनुसूचित जाती,जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे नोंद करण्यात आले आहे.

सदरील रामधन धिरे यांचे वाद झाल्यानंतर त्या ठिकाणी गेलेल्या दिपक रामधन धिरे, लक्ष्मण भीमा धीरे, विशाल सुनील धीरे, श्रावण बाळू धीरे यांनी फक्त तु आमच्या आम्ही वहिती केलेल्या जमिणित जणावरं का चारतोस भांडणाचीची कुरापत का काढतोस असं च विचारलं असता पोलिस स्टेशनमध्ये जाऊन जगजीवन आंबाड यांनी मला गमज्याने गळ्याला आवळत जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा व खिश्यातील 5-7 हजार रूपये काढून घेतल्याची तक्रार पोलांमध्ये केली याचं तक्रारीवरून पोलिसांनी दिपक धीरे, विशाल धीरे, लक्ष्मण धीरे सतीश धीरे ,सुनील धीरे, श्रावण धीरे अशा सात जणांविरुद्ध युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात कलम 307 ,395 ,323 ,504 506 भारतीय दंडविधान नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु आंबेडकरी चळवळीतील एक शिलेदार असलेल्या वंचित बहुजन आघाडी चा केज तालुका संघटक वर यांच्या वर व इतर समाज बांधवांवर दरोडेखोराची 395 सारखी गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे गावकऱ्यांच्या सांगण्यावरून विशाल धीरे व श्रावण धीरे यांच्यासारख्या सुशिक्षित तरुणांना बदनाम करून दिशाहिन करण्यासाठी दरोडेखोरीसारख(395) सारखे गुन्हे दाखल केले आहेत अशीच भावना पंचक्रोशीतील आंबेडकरी चळवळीतील सुक्षिशित तरुणांमध्ये‌ असल्याची दिसून येत आहे. व‌ हे विशाल धिरे व इतरांवर जे कलम 395,506 नुसार जे गुन्हे दाखल गेले आहेत ते मागे घेण्यात यावेत अशीच मागणी पोलिस प्रशासनाकडे पंचक्रोशीतील तरूण करत आहेत.