चंद्रपुरात कौटुंबिक न्यायालय व्हावे – डॉ मैंदळकर

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.17ऑगस्ट):-भारतीय परिवार बचाव संघटना चंद्रपूर(सेव्ह इंडियन फॅमिली फाऊंडेशन)चर्चासत्र ऍड सारिका संदूरकर,ऍड धीरज ठवसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले,सभेत मोहब्बत खान यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना जिल्हाध्यक्ष डॉ नंदकिशोर मैंदळकर यांनी चंद्रपूर येथे कौटुंबिक न्यायालय व्हावे अशी आशा व्यक्त केली,चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या 2194262 असून पुरुष 1120316 आहे,स्त्रिया 1073946 आहे,ग्रामीण एकूण संख्या 1424424 तर शहरी 769838 आहे स्त्री पुरुषयांचे गुणोत्तर प्रमाण 959 एवढी आहे.

सन 2015 मध्ये जिल्ह्यात स्त्री अत्याचाराच्या 2500 हुंडाबळी प्रकरणाची नोंद आहे,समाजात सजातीय,कौटुंबिक वा सहविचार विवाह (अरेंज म्यारेज)पेक्षा आंतरजातीय विवाह,प्रेम विवाह,लिव्ह इन रिलेशन शिप नंतर विवाहात कौटुंबिक समस्या वाढत आहे,महिला कायद्याचा गैरवापर करून लग्नानंतर ब्लॅकमेल करून पैसे उकळणे,अनेक पुरुषासोबत लग्न करणे व पुरुषांना ठगणे खुलेआम सुरू आहे,माहेरची मंडळी मुलीला हाताशी धरून पती व सासरला खोट्या गुन्ह्यात गोवत आहे.आज हुंडाबळीचा खुळखुळा महिलांच्या हातात आहे कधीही वाजवा व पती,सासू,सासरा,नणंद,जाऊ,व त्यांचे नातेवाहिक याना गजाआड करण्याची खुमखुमी वाढली आहे.

पत्नी हुंडाबळी,गृहहिंसाचार,पोटगी,विनयभंग, मी टु, बलात्कार चे आरोप करून सासर ला बदनाम करण्याचे षडयंत्र करीत आहे.यामागे मुख्य कारण पैसा, व संपत्ती आहे शासन व प्रशासन यांनी केलेल्या आरोपाची गांभीर्याने चौकशी करूनच गुन्हा नोंदवावा,स्त्री दोषी आढळली तर तीच्यावर ही कार्यवाही व्हावी भारतीय संस्कृती संपूर्ण जगात स्रेष्ठ मानल्या जाते परंतु या प्रकारामुळे संस्कृतीला डाग,ग्रहण लागले.भविष्यात कौटुंबिक समस्या वाढण्याची दाट श्यक्यता आहे.

आई वडिलांची माया,बहीण भावातील जिव्हाळा,कुटुंबातील आपलेपणाची भावना मुलांच्या मनात वाढीस लागावी,कुटुंबाची संकल्पना टिकून राहावी,पती पत्नीतील वाद संपुष्टात यावे,पाल्याना संपूर्ण घराचा अनुभव जगता यावा,यासाठी कौटुंबिक कलहाचे निकाल लवकरात लवकर लागावे या उद्देशाने चंद्रपूर येथे कौटुंबिक न्यायालय व्हावे असे मत डॉ नंदकिशोर मैंदळकर यांनी गरज व मागणी चर्चा सत्रात व्यक्त केली.सभेला सुदर्शन नैताम,डॉ राहूल विधाते,सचिन बरबटकर,मोहब्बत खान गंगाधर गुरनुले,नितीन चांदेकर,राजू कांबळे,किशोर जांपालवार,पिंटू मून स्वप्नील गावंडे विनोद करमरकर,उपस्थित होते.