खदखदणारा अफगाणिस्तान

33

सारे जग कोरोनाच्या महामारीने त्रस्त असतांना काही देशात वर्चस्व व कट्टर हुकूमशाहीवृत्तीने धुमाकूळ घातला आहे.स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्याच बांधवाचे शोषण केले जात आहे.नुकतेच अफगाणिस्तान मध्ये तालिबान दहशतवादाची संघटनेने लोकशाही व्यवस्था उलथवून लावली आहे.१९९९ जेव्हा तालिबानाने अफगाणिस्तानात सत्ता काबीज केली तेव्हा त्यांनी स्त्री व सामान्य लोकांना नरकयातना दिल्या .साऱ्या मानवीय अधिकाराचे हनन करून मानवतेची क्रुर हत्या केली.रक्तरंजित ध्येयधोरणाचा उपयोग करून तिथल्या जनतेला गुलाम केले.आज अफगाणिस्तानने आपल्या लोकशाहीला कट्टर तालिबानाच्या हाती सोपवून जनतेला कसायाच्या हवाली केले आहे.आज अफगाणिस्तानतील जनता भीतीने त्रस्त आहे.तालिबानाच्या अन्याय अत्याचार व क्रुरतेचा विकृतने तो घायळ झाला आहे.आपला जीव वाचवण्यासाठी तो स्वतःचे जीवन मृत्यूच्या हवाली करत आहे.

राजधानी काबुलवर तालिबानने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.या कार्यासाठी अमेरिका ,चीन , पाकिस्तान यांनी तालिबानला मदत केली असावी असे वाटते.अफगाण सैनिकासमोरील लढण्याची प्रेरणा नसल्याने त्यांनी आपले शस्त्र तालिबान्यासमोर खाली ठेवले.लोकशाहीचे लचके तोडून देशात अराजकतेचे अभुतपूर्व वातावरण निर्माण झाले आहे.जगाने या घटनेकडे एका देशाची घटना न पाहता.ही वृत्ती मानवतेवरील संकट आहे आज जरी ते संकट अफगाणिस्तानावर आलं असेल तरी ते कधी आपल्या देशात दस्तक देईल ते सांगता येत नाही.

वर्तमान जगात कट्टर हुकूमशाहीवृत्तीचे भरपूर पीक उभे होत आहे.धार्मिकतेच्या कट्टरसंजिवनीवर हे पीक फोफावले आहे.या पीकाचे मुळे जोपर्यंत उद्धवस्त केले जात नाही तोपर्यंत ही व्यवस्था नष्ट होणार नाही.भारतातही धार्मिक विकृतीची नवी बिनमेंदूची जमात तयार केली जात आहे.ही विकृती सुध्दा भारतीय लोकशाही उलथवण्याच्या बेतात आहे. तालिबानची जे नियम व कायदे आहेत असेच कायदे मनुस्मृतीत होते.ह्या अव्यवस्थेने भारतीय बहुजन वर्गाला गुलामीत ठेवले होते .एका वर्गाला सारे अधिकार दिले होते . बहुजनाचे मानवीय अधिकार नाकारले होते . इथल्या मुलनिवासीना क्रुरतेने छळले होते.हीच व्यवस्था साऱ्या देशावर राज्य करण्याच्या तयारीत आहे.

देशाचे संविधान व तिरंगा नाकारणे ही देशद्रोही विकृत मेंदूची सत्तानशा जोरकसपणे नाचत आहे.एकतंत्र हुकूमशाही अमलाचे वास्तव आपण नोटबंदी व लॉकडाऊनमध्ये पाहिले आहे.कश्मीरमध्ये जे मानवाधिकाराचे सर्रांस उल्लंगण झाले ही विकृतीही तालिबानासारखीच व्यवस्था आहे.
भारताने आपला ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला पण काही प्रशासकिय व अधिकाराच्या कोतेपणाने काही शाळेत ध्वजारोहण झाले नाही.गावात स्वातंत्र्यदिनाचा जो उत्साह असतो तो दिसला नाही.ही कृती स्वातंत्र्य लोप पावल़्याची आहे.देशातील लोक स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी प्रशासनाच्या आदेशाची वाट पहातो ही गंभीर गोष्ट आहे.स्वः कोरोना प्रोटोकाल न पाडणारे प्रधानमंत्री व गृहमंत्री लोकांना नियम पाळण्याचे आव्हान करतात हा विरोधाभास भारतीयांनी ओळखला पाहिजे.देशाला गुलाम करणाऱ्या कावेबाजापासून देशाचे संरक्षण केले पाहिजे.

अफगाणिस्ताना हा सदोदीत अस्थिर असाच देश राहला.बौध्द धम्माच्या प्रभावी काळात व अशोककालीन काळात हा देश प्रगतीपथावर होता.अफगाणिस्तानी लोक बुध्द् धम्माचे उपासक होते.या देशाचा मुख्य धर्म बौध्द होता.हा देश शांती व भाईचाराने राहणारा होता पण मध्ययुगाच्या अंधःकारमय काळात हा देश कट्टर इस्लामाच्या हातात गेला.बुध्द धम्माच्या लोकांचे व भिख्खूचे मोठे हाल केले.अफगानिस्तानच्या भूमितील बामियान पहाडातील बुध्द् मूर्ती डायनामाईटने तालिबान्याने २००१ला फोडली. तालिबान्याची राजवट म्हणजे अमाणुषतेचा कळसच होय.धर्माधिष्टीत माणूस तयार करणे ही त्याची शिकवण आहे.स्त्रीयांचे सारे मानवीय अधिकार संपुष्टात आणने ही त्याची नीती आहे.तालिबानच्या कोणत्या नीतीवर जगाने विश्वास ठेवू नये.पण आज तालिबान एक सत्य आहे.त्याला पनाह देणारे देश असत्य आहे.

तालिबानने काबुल कब्जा करताच स्त्रीवरील पोस्टर मिटवले आहेत.काबुलमध्ये अराजकात माजली असून देशातील नागरिकांना देशात काय सुरू आहे हे समजू शकले नाही.आपला देश आपलाच शत्रू समजून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते पलायन करत आहेत. काबुल विमानातळावर एकच कलह झाला आहे.कोणी कुणाला मानत नाही.सारेच माणसे सैवराचारी झाले आहेत. तालिबानचा नरसंहार इतका भयावह आहे की ते जनावरसारखी वागणूक देतात.स्त्रीवर अतोनात अत्याचार करतात.
आज जगानी एक होऊन तालिबावृत्तीला ठेचले पाहिजे.ज्या देशात धार्मिक कट्टरता माजवली जाईल त्याठिकाणी युनोने योग्य कार्यवाही करावी.त्यांना मिळणारे सारे स्त्रोत बंद करावे.अफगानिस्तानातील लोकांचे प्राण वाचवणे हे साऱ्या जगाचे पहिले कर्तव्य असावे.तालिबानच्या सरकार राजकीय सत्तेत भागीदारी देऊ नये.धार्मिकविकृतीच्या ठोकशाहीचा बिमोड करण्यासाठी लोकशाहीवादी देशाने कंबर कसावी.भारताने पुढाकार घेऊन नवी रणनीती आखावी.कारण अफगाणिस्तान आपला शेजारी देश आहे.त्याचे गंभीर परिणाम भारतावर होण्याची दाट शक्यता आहे.आपले बांधव अफगाणिस्तानात अटकले आहात त्यांना आणण्यासाठी त्वरीत नियोजन करावे.देशातील आमदार व खासदारा यांचा तोंडे बंद ठेवावी.बिनडोक काही नेते देशाचे धर्मनिरपेक्ष वातावरण गडूळ करत आहेत.त्याच्यावर कठोर कार्यवाही करावी.एकाच धर्माचे तुणतुणे वाजवणे बंद केले नाहीतर त्यांची आमदारकी व खासदाराकी रद्द करावी. राजकिय ज्या पक्षाने तिरंगाध्वजाचा अपमान केला त्या पक्षाची मान्यता काढून त्याला राजकिय व्यवस्थेतून हद्दपार करावे.देशाचे सौहार्द बिगळणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी.जर आपण विभागले गेलो तर देशाला अस्थीर करणारे टकलू मेंदू तालिबानसारखे टपून आहेत.हे विसरता कामा नये.

आज मानवावर जे संकट उभ आहे ते म्हणजे कट्टरवृत्तीचे आहे.चीन ,द.कोरीया, पाकिस्तान,हे देश कट्टर वृत्तीचे आहेत यापासून आपण सावध राहावे. आज अफगाणिस्तान खदखदत आहे याला कोण जबाबदार हे ओळखून आपली चाल चालावी नाहीतर देशाला आंतरिक व बाहेर कट्टर तालिबानवृत्तीपासून धोका आहे.काही भारतीय राज्यात असंतोष वाढत आहे.भारतीयांनो सावध असा काळ अत्यंत वेगाने बदलत आहे.
येणाऱ्या समस्येला भारतीय म्हणूनच सामोरे जा.जाती व धर्म यांच्या भिंती तोडून प्रथम भारतीय व अंतिम भारतीय हाच विचार देशात पेरा.हाच योग्य मार्ग आहे. दुसरा मला माहित नाही.

✒️संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००