डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीचे काम पूर्ण

    42

    ?तळा उभारणीमुळे उमरखेड शहराच्या सौंदर्यात भर

    ?पुतळा संकलन निधी समिती, व कार्याध्यक्ष, सिद्धार्थ दिवेकर यांच्या कार्याला अखेर यश

    ✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

    उमरखेड(दि.17अगस्ट):-दिनांक 16 अगस्ट 2021 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता उमरखेड येथील नियोजीत जागेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळा उभारनीचे काम पूर्ण झाले.

    मागील दोन वर्षा पासून उमरखेड नगरपालिकेच्या वतीने सुंदर अश्या पूर्णाकृती पुतळा जागेचे सौंदर्यकरण करण्यात आले.परंतु त्याठिकाणी जुन्या पुतळ्या ऐवजी नवीन पुतळा या जागेत बसवल्यास उमरखेड शहराच्या सौंदर्यात अधिक भर दिसेल असे सामान्य जनतेला वाटू लागले.

    ही बाब भीम टायगर सेनेचे शहराध्यक्ष सिद्धार्थ दिवेकर यांच्या लक्षात आल्याने यांनी फेसबुक आणि व्हाट्सएपच्या माध्यमातून समाजातील दाणी लोकांना आवाहन केले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नवीन पुतळा कसा आणता येईल..? या करिता लवकरच मिटिंग करून नियोजन करण्यात आले.

    या कामाकरिता कुमार केंद्रेकर, प्रफुल दिवेकर, राहुल काळबांडे अश्या अनेक सहकाऱ्यांना सोबत घेऊन व स्वतः पुढे होऊन तीन मिटिंग चे आयोजन करण्यात आले. व समाज बांधवांना एकत्र आणून पूर्णाकृती पुतळा कसा पूर्णत्वास येईल यासाठी चा संकल्प निर्माण केला.

    याकरिता सुमेध बोधी बुद्ध विहार बोरबन येथे शेवटच्या मिटिंगचे आयोजन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नवीन पुतळा निधी संकलन समितीची स्थापना करण्यात आली.
    या निधी संकलन समितीचे अध्यक्षपदी मा. सुभाषराव दिवेकर (माजी उपविभागीय पोलीस अधिकारी मुंबई) यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. व पूर्णाकृती पुतळा हा लोकवर्गणीतून आणायचा.असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. परंतु कोरोना या महामारी संकटामुळे लोकडाऊन सुरु झाल्याने हाती घेतलेल्या कामाला खिळ बसली.

    त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या समाज बांधव यांचेकडून आपण निधी कसा जमा करावा असा प्रश्न निर्माण झाला.म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष, मा.नितीन भुतडा व निधी संकलन समितीचे अध्यक्ष मा. सुभाषराव दिवेकर यांच्या अथक प्रयत्नातून व आर्थिक सहाय्य केल्यामुळे दिनांक 16 ऑगस्ट 2021 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा मुंबई येथुन आणण्यात आला.

    उभारण्यात आल्याने उमरखेड शहराच्या सौंदर्यात अधिक भर पडल्याचे सर्वसामान्य व उमरखेड वासीय यांची प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे दिसून आले आहे.या भव्य दिव्य पूर्णाकृती, पुतळ्याचे शिल्पकार देवेश राठोड यांचा मा. सुभाषराव दिवेकर व मा.नितीन भुतडा यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

    नवीन पुतळा उभारणीचे काम पूर्णत्वास गेल्याने पुतळा
    उद्धघाटन सोहळा कार्यक्रम येत्या काही दिवसात होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

    या ऐतिहासिक भव्य पुतळा उभारणीला कार्यासाठी सिध्दार्थ दिवेकर, कुमार केंद्रेकर, प्रफुल दिवेकर, प्रा.अनिल काळबांडे, सुधाकर लोमटे सर, बी.के सोनूल, राहुल काळबांडे,विरेंद्र खंदारे, संतोष निथले, निकेश गाडगे, अमोल मुनेश्वर, ऍड. शंकर मुनेश्वर, निखिल दवणे, भन्ते कीर्ती बोधी, दिगंबर श्रवले, भीमराव गवंडे, पांडुरंग धुळे व महिला मंडळ इत्यादीं समाज बांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले.पुतळा उभारनी कार्यक्रमाकरिता अनेक समाज बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.