प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा. पँथर डॉ. राजन माकणीकर

    131

    ✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    मुंबई(दि.17ऑगस्ट):-भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी इच्छा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी सोसिएल मीडिया द्वारे व्यक्त केली.*

    मोदी देशाचे प्रधानमंत्री झाल्यापासून देशाची अर्थव्यवस्था तर खाली घसरलीच आहे मात्र; देशात महागाई वाढली आहे महिलांच्या बाबतीत देश असुरक्षित झाला आहे, सीमेचे रक्षण प्रश्नांकित असून देशाचा संरक्षक सुद्धा असुरक्षित झाला आहे.

    सैन्याचे बलिदान सुद्धा राजकारणासाठी वापरले जात आहे, दलित मुस्लिम व सर्व जातीधर्मातील महिलांमध्ये कमालीची दहशत आहे. मजुरांचे सर्व अधिकार हिरावले गेले आहेत, शेतकरी हवालदिल झाला आहे, सर्व सरकारी कंम्पन्या व संस्थाने धनदांडग्या च्या हवाली करून खाजगीकरणं केलं गेलं आहे.

    भारतीय संविधान, भारतीय तिरंगा, देशाचे सार्वभौमत्व आणि लोकशाही ची लक्तरे काढली जात आहेत, खुद्द प्रधानमंत्री ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षांकडून संविधान, तिरंगा व लोकशाहीचा अवमान केला जात आहे. स्वातंत्र्या पासून जे घडलं नाही ते विपरीत देशात घडत आहे.

    खाजगिकर्णाच्या माध्यमातून आरक्षण पूर्णपणे संपवले गेले आहे, यामुळे देशातील सामाजिक व आर्थिक स्तर खालावला जाऊन गरिबी तोंड वर काढून देशात असमतोल निर्माण होणे आहे.

    शिक्षनाच महत्व कमी केलं जातं आहे, पदवीधरांना पकोडे विकण्याचा सल्ला देणारे प्रधानमंत्री हे देशाचे विकासपुरुष नसून विनाशक पुरुष म्हनुन वास्तवात दिसत आहे अशी टीका सुद्धा त्यांनी यावेळी केली.

    आदी व या धोरणाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नैतिकदृष्ट्या आपल्या संविधानिक पदाचा राजीनामा देऊन देशाला सुखी व संपन्न करावे अशी इच्छा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव, विद्रोही पत्रकार, पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी सोसिएल मीडिया च्या माध्यमातून व्यक्त केली आहे.