विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी”भारतीय विद्यार्थी मोर्चा”च्या माध्यमातून समस्या निराकरण कक्षाची स्थापना-चेतन आवडे

24

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.17ऑगस्ट):-भारतीय विद्यार्थी मोर्चा हे एक सामाजिक आणि गैरराजनितिक संघटन असुन शोषित,पिढित,गरीब विद्यार्थ्यांच्या न्याय आणि हक्काची लढाई लढत असतांना विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागृती आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचे काम मागील दहा वर्षांपासून करीत आहे.गेल्या काही वर्षांपासून खालावलेला शिक्षणाचा दर्जा, चुकीच्या पद्धतीने शिक्षण धोरण ,अमाप फी वाढ आणि online lecture च्या नावाखाली शिक्षणाची औपचारिकता करणे तसेच विद्यार्थ्यांच्या सरसकट पास करण्यामुळे त्याच्या बौद्धिक क्षमता कमी करण्याचे षडयंत्र या व्यवस्थेच्या मार्फत वेगाने राबवले जात आहे.

या समस्यांना लक्षात घेता शोषित, पिडित,गरीब, विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहु नये आणि त्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय ,अत्याचार होऊ नये, याकरिता भारतीय विद्यार्थी मोर्चा ही संघटना पुर्वी पासुन कार्यरत होतीच, परंतु वाढत्या समस्यांना पाहता विद्यार्थ्यांच्या न्याय आणि हक्काची लढाई आणखी ताकतीने लढण्यासाठी “भारतीय विद्यार्थी मोर्चा समस्या निराकरण कक्ष” याची स्थापना करण्यात आली आहे.प्रा.दिपक वासनिक सर ( प्रदेश प्रभारी,भारतीय विद्यार्थी मोर्चा, महाराष्ट्र राज्य) आणि योगेश थोरात सर (प्रदेश अध्यक्ष,भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र राज्य) यांच्या दिशा निर्देशानुसार ही कमिटी महाराष्ट्र मध्ये काम करेल असे भारतीय विध्यार्थी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चेतन आवडे यांनी सांगितले.

यासाठी गरजू गरीब विध्यार्थ्यानी खाली दिलेल्या हेल्प लाईन नंबरवरती 8767892260 संपर्क करावा किंवा इमेल द्वारे
(EMAIL ID :-bvmbymbbm1818@gmail.Com)आपल्या समस्यांचे निराकरण करावे.दिनांक 17 जून 2021 रोजी “भारतीय विद्यार्थी मोर्चा समस्या निराकरण कक्ष” याची कार्यकारिणी घोषित करण्यात आली होती ज्या मध्ये. मा. श्रेयस वेताळ ( राज्य प्रभारी, समस्या निराकरण कक्ष, महाराष्ट्र प्रदेश),मा.इंजि.सुरज तागडे ( राज्य सचिव, समस्या निराकरण कक्ष, महाराष्ट्र),मा.इंजि.संदेश कांबळे ( राज्य सदस्य, समस्या निराकरण कक्ष, महाराष्ट्र), मा. माधुरी भंडारे ( राज्य सदस्य, समस्या निराकरण कक्ष, महाराष्ट्र), मा.अमोल बोराडे ( राज्य सदस्य, निराकरण कक्ष, महाराष्ट्र)
यांची निवड करण्यात आली