निरोगी जीवनासाठी दवाखाना पेक्षा हवाखाना कधीही चांगलं – प्रांतप्रभारी दिनेश राठोड

19

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी (दि.17 ऑगस्ट):- पतंजली योग समिती महाराष्ट्र पूर्व चे प्रांत प्रभारी दिनेशजी राठोड यांनी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्हा नियोजित दौरा दरम्यान अलिकडेच ब्रम्हपुरी येथे पतंजली योग समिती जिल्हा कार्यालयाला मुक्कामी भेट दिली. यादरम्यान त्यांनी तालुका तथा जिल्हा कार्यकारीणी सदस्यांना मार्गदर्शन केले. ब्रम्हपुरी तालुक्यातील प्रत्येक गावागावात योगगंगा पोहचविण्याचे व विस्कटलेल्या ग्रामीण पुरातन संस्कृतीला पुनर्जिवित करण्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.

प्रांतप्रभारींचे स्वागत शाल- श्रीफळ देऊन पतंजली योग समिती तालुका प्रभारी नरेश ठक्कर , चिकित्सक प्रभारी डॉ. नरेश बावनकुळे, किसान सेवा समिती प्रभारी हरिश्चंद्र टिकले यांनी केले. प्रास्ताविकात भगवानजी पालकर जिल्हा प्रभारी पतंजली योग समिती जिल्हा चंद्रपूर यांनी जिल्ह्यातील व विशेषत: ब्रम्हपुरी तालुक्यातील पतंजली परिवाराच्या कार्याचे विवेचन केले.

याप्रसंगी संजय चाफले यवतमाळ जिल्हा प्रभारी, राजकुमार पाठक तथा मनोहर टहलियानी,नरेश ठक्कर यांनी देखिल मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत स्वाभिमानचे तालुका प्रभारी भगवानजी कन्नाके यांनी व आभारप्रदर्शन जिल्हा मिडीया प्रभारी सुभाषजी माहुरे यांनी केले. तालुका कार्यकारीणी बैठकीला चंद्रपूर जिल्हा रक्तदान प्रभारी स्वप्निल अलगदेवे योगसाधक साईराम सपाटे, अनिरूद्ध कात्यायन , प्रभाकर डबले , मधुकर खेत्रे , हनुमंतराव राऊत , दिनकरराव हजारे , तेजराम येरणे , रामकृष्ण थोटे,यशवंत तलमले प्रामुख्याने उपस्थित होते.