चंदन तरवडे यांना आंतरराष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान

23

✒️अंगद दराडे(विशेष प्रतिनिधी)

बीड(दि.17ऑगस्ट):-ज्येष्ठ पत्रकार,साहित्यिक आणि न्यायप्रभात मासिक वृत्तपत्राचे संपादक शिवाजीराव खैरे यांना पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि विश्वविक्रमवीर सर डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते फ्रेंड्स क्रिएशन संस्थेतर्फे २०२१चा ऑनलाईन,आंतरराष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तसेच याच सोहळ्यात फ्रेंड्स क्रिएशन संस्थेतर्फे सांस्कृतिक क्षेत्रात मौलिक योगदान देणाऱ्या 10 गुणवंतांना डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते FriendsInternational Award For GloriousAchievements In Cultural Fields प्रदान करण्यात आले.

तृप्ती शिवाजी खैरे, अनुसया शिवाजी खैरे ,अनुष्का अनिल गोवेकर, फिरोज जहांगीर मुल्ला,चंदन सुशील तरवडे,प्रतिमा अरुण काळे, राजश्री संदीप मराठे, सविता पद्माकर पाटील,अक्षय तानाजी पवार आणि नागेश सोपान हुलावळे हे सदर आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

राष्ट्रकल्याणासाठी अविरतपणे निरपेक्ष आणि त्यागी भावनेने आपले जीवन समर्पित करणारे उच्च आदर्शवादी मूर्तिमंत व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजीराव खैरे असे गौरवोद्गार खैरे यांना आंतरराष्ट्रीय सन्मान प्रदान करताना डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी काढले. प्रत्येकाने आपल्यातील सद्गुण राष्ट्रहिताच्या सत्कारणी लावावेत,असेही डाॅ.घाणेकर पुढे म्हणाले. “हा सन्मान समाजातील उच्च आदर्शवादाचा आहे कारण त्यामुळेच मी घडलो” अशी कृतज्ञतेची भावना सत्काराला उत्तर देताना श्री.शिवाजीराव खैरे यांनी व्यक्त केली.डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित ‘डहाळी’अनियतकालिकेच्या २५० व्या अक्षरमंच काव्य विशेषांकाचे प्रकाशन शिवाजीराव खैरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी बाळासाहेब अमृतसर,अनुसया खैरे आदी मान्यवरांची श्री.खैरे यांच्या विषयी गौरवपर भाषणे झाली.प्रतिमा काळे यांनी प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन केले.सौ.राजश्री मराठे आणि सौ.चंदन तरवडे यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात काव्यसंमेलन झाले. यातील वंदना हुंडावार,प्रफुल्ल माने,सुरेखा हरपळे, संजय जाधव, वैशाली साळुंके यांच्या कविता सर्वोत्कृष्ट ठरल्या.अनुष्का गोवेकर यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली.प्रमुख अतिथी या नात्याने डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी गझल,कवितेचे सादरीकरण करुन काव्यप्रेमींची मने जिंकली.तृप्ती खैरे यांनी वंदे मातरम सादर केल्यावर या सोहळ्याची सांगता झाली.