निलज येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत वृक्षारोपण

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 18 ऑगस्ट):- ब्रम्हपुरी तालुक्यातील निलज येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.

सदर वृक्षारोपण प्रसंगी निलज येथील सरपंच हेमंत ठाकरे, शा.व्य.समीतीच्या अध्यक्ष निताताई धोंगडे, उपसरपंच शंकर कोपुलवार, शा.व्य. उपाध्यक्ष अशोक भुते, मुख्याध्यापिका सुनीता रासेकर, ग्रामसेवक तलमले, ग्रा. पं.सदस्य नारायण मेश्राम, ग्रा.पं.सदस्य मनोहर राहाटे, ग्रा.पं.सदस्या शिलाताई सोंदरकर, ग्रा.पं.सदस्या जान्हवी पिलारे, ग्रा. पं. सदस्या प्रियाताई ढोरे, ग्रा.पं.सदस्या कल्पना मांढरे, ग्रा.पं.सदस्य भाविका मांढरे, आरोग्य सेवक चहांदे,विश्वनाथ नखाते, धर्मपाल राहाटे, विलास नारवनरे, दयानंद बांकमवार, माधव ढोरे,सुरेश ढोरे, देवेंद्र भर्रे, रींगनाथ पिलारे, वैजयंती वाळके, कुंदा हटवार, मुन्नी जुनघरे, धनलक्ष्मी तुळशीकर, इंदुताई ढोरे, शाळा व्यवस्थापन समीती सदस्य तथा पत्रकार राहुल मैंद यांची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असुन प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून एक तरी झाड लावले पाहिजे असे यावेळी सांगितले.