गंगाखेड तालुक्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी- बळीराजा सुखावला

21

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी )

गंगाखेड(दि.18ऑगस्ट):-गेल्या जुलै महीन्याच्या पहील्या आठवड्यात पासून पावसाने दडी मारल्याने गंगाखेड तालुक्यांमध्ये पावसाने तब्बल तीन आठवडे विश्रांती घेतल्या नंतर पावसाने जोरदार हजेरी लावली मागील तीन आठवडे पावसाने दडी मारली होती. सध्या सोयाबीन, मुग,हबरेट ज्वारी, कापसाचे पिके चांगल्या जोमात असून त्याना फुले लागली आहेत. सध्या त्यांना पावसाची अत्यंत आवश्यकता होती. ह्या आठवड्यात जोरदार पाऊस पडेल अशे अंदाज हवामान खात्याने दर्शविले होते आणि ते खरे ठरले असून पिकांना नव संजीवनी मिळाली आहे.

पाऊस पडतो की नाही अशी चिंता शेतकर्याना वाटू लागली होती पावसाच्या चिंतेने शेतकऱ्या वर्गाचा तालुक्याच्या बाजार पेठेत शुकशुकाट दिसू लागला होता. शेतकऱ्यांनी बाजारपेठेत येणे बंद केले होते औषध कीटकनाशके आधीच घेऊन ठेवली असता फवारणी करून उपयोग काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला होता. पाहिजे तेवढा पाऊसच पडत नसल्याने शेतकऱ्यांचे शेतातील सोयाबीन, मुग, हबरेट ज्वारी, कापूस वाळून जाऊ लागली होती. शेतकरी मात्र हैराण झाले होते हाताला आलेले पीक जाते की काय अशे वाटू लागले होते मात्र तालुक्यांमध्ये काल पासून पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुले शेतकरी राजा आता सुखावला आहे.